34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध वापरणारे लाखो ग्राहक आहेत. परंतु, आपण विकत घेतलेले दूध भेसळ युक्त आहे का, ते शुद्ध आहे का , आरोग्यासाठी उपयुक्त आहे का याची माहिती त्यांना नसते. केवळ विश्वास म्हणून आलेले बाजारातील दूध अनेक प्रकारे भेसळ केलेले असते . गायी म्हशी ला ऑक्सिटोंन नावाचे रासायनिक संप्रेरक असलेले इंजेक्शन देऊन दूध देण्यास भाग पाडले जाते किंवा दुधाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले जाते.

केवळ “विश्वास” या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो ग्राहक आहेत. परंतु, आपण विकत घेतलेले दूध ( Milk) भेसळ युक्त आहे का, ते शुद्ध आहे का , आरोग्यासाठी उपयुक्त आहे का याची माहिती त्यांना नसते. केवळ विश्वास म्हणून आलेले बाजारातील दूध अनेक प्रकारे भेसळ केलेले असते . गायी म्हशी ला ऑक्सिटोंन नावाचे रासायनिक संप्रेरक असलेले इंजेक्शन देऊन दूध देण्यास भाग पाडले जाते किंवा दुधाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले जाते.(Milk sample free testing camp at Nashik Untwadi Road)

हे दूध सेवन केल्यामुळे ,लहान मुलांचे शाररिक वाढीवर दुष्परिणाम दिसून आले आहेत. अश्या दुधाचे सेवन केल्यामुळे अवेळी हार्मोन्स निर्मिती होऊन छाती चा आकार मोठा होणे , चेहऱ्यावर केस येणे , जुलाब होणे इत्यादी लक्षणे दिसून आले आहेत.

तसेच थेट दुधात भेसळ करण्यासाठी अस्वच्छ पाणी घातले जाते तर युरिया , सर्फ पावडर , पीठ , साखर सारखे अनेक रसायने सर्रास भेसळ केली जातात. भेसळ युक्त दूध म्हणजे विकत घेतलेले विष असून हळू हळू ते शरिरातील अनेक अवयावर दूरगामी दुष्परिणाम करते. किडनी , यकृत , पचन संस्था यांचे विकार शरीरात बळावतात. दूध भेसळ हा गंभीर गुन्हेगारी प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून सामान्य दूध ग्राहक याचा थेट शिकार झाला असूनही तो मात्र या बाबत उदासीन आहे.

एप्रिल महिन्यात दूधग्राहक जागृती साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे देशभर जागृती मोहीम सुरू केलेली असून त्याचाच भाग म्हणून अ भा ग्रा पं नाशिक जिल्हा व अन्न औषध प्रशासन नाशिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे 2024 बुधवार रोजी सकाळी 10.00 ते 12.00 दरम्यान , इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स सभागृह, उंटवाडी रोड येथे “दुध नमुना मोफत तपासणी शिबीर” आयोजन केले आहे.

नाशिक जिल्हा अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त संजय नारगुढे हे शिबिरार्थीना अन्न व दुधभेसळ संबंधी कायदेशीर तरतुदी समजावून सांगणार आहेत तर जिल्हा शासकीय अन्न प्रयोगशाळा नाशिक चे अधिकारी श्री बयलें हे दूध भेसळ तपासणी प्रक्रिया या बद्दल माहिती देतील. दूधभेसळ व अन्न तज्ञ , अश्वमेध लॅब च्या संचालिका डॉक्टर अपर्णा फरांदे या पॉवर पॉइंटच्या माध्यमातून ,घरच्या घरी दूध भेसळ तपासणी कशी करावी या बाबत माहितीचे सादरीकरण करतील व त्यांचे सहकारी शिबीर स्थळी दूध भेसळ नमुने तपासून देतील. 105 ml कोरे दूध नमुना, नाव व मोबा क्रमांक लिहून प्लास्टिक बॉटल अथवा पिशवी मध्ये शिबीर स्थळी आणावे व तपासणी कौंउटर ला जमा करावे तसेच सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

दूध नमुना तपासणी जन जागृती, शिक्षण आणि व्यक्तीगत माहिती साठी असून शिबिर लाभ मोफत आहे. शिबीर फक्त 2 तास सुरू राहणार आहे. मागणी वाढल्यास आधी नाव नोंदणी करणार्यांनाच फक्त लाभ दिला जाईल.

त्यामुळे नाव नोंदणीसाठी 9823599957 किंवा 7972931763 या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा शिबीर सर्वासाठी खुले असून त्यातही गृहिणींनी व महिलांनी याचा जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष इंजि हि. रा. जाधव यांनी आमचे वृत्त प्रतिनिधींशी बोलताना केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी