31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार आहे. नियमानूसार तीन वर्ष‍ांनी हि वाढ केली जाणार आहे. मागील वर्षी जाहिरात करातून ऐंशी लाखांचे उत्पन्न मिळाले होते. दरवाढीमुळे उत्पन्नाचा आकडा एक कोटींच्या पलीकडे जाईल. त्यामुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार आहे. नियमानूसार तीन वर्ष‍ांनी हि वाढ केली जाणार आहे. मागील वर्षी जाहिरात करातून ऐंशी लाखांचे उत्पन्न मिळाले होते. दरवाढीमुळे उत्पन्नाचा आकडा एक कोटींच्या पलीकडे जाईल. त्यामुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.(Municipal Tax Collection Department increases advertising tax by 10%)

महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा करसंकलन व जाहिरात परवाने विभागाचा असतो. दरवर्षी तीनशे ते चारशे कोटिंचे उत्पन्न मनपाला मिळते. त्यात जाहिरात परवानग्या व कराचा मोठ‍ा हातभार असतो. गतवर्षी जाहिरात परवाना शुल्कात तब्बल चार पटिने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मनपा त्यातून मिळणार्‍या उत्पन्नामुळे मालामाल झाली. त्यानंतर आता करसंकलन विभागाने जाहिरात करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील तीन वर्षांपासून ९ रुपये ६६ पैसे चौरस फूट वार्षिक जाहिरात कर आकारला जातो. आता पुढिल तीन वर्षासाठी त्यात दहा टक्के वाढ केली जाणार असून ११ रुपये चौरस फूट कर आकारला जाईल. शहरात ८१४ होर्डिंग्ज असून अडिच हजाराच्या घरात इलेक्ट्रिक पोलवर छोटे जाहिरात फलक लावले जातात. बांधक‍म प्रोजेक्ट, वाढदिवस शुभेच्छा, राजकीय व शैक्षणिक जाहिराती यासंह इतर जाहिरातींचे फलक लावले जातात. त्यावर आता जुन्या दराच्या दहा टक्के जादा जाहिरात कर आकारला जाणार आहे. करसंकलन विभागाला नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी करायची होती. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे येत्या चार जूनला आचारसंहिता संपल्यानंतर हा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी