31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट, महाविद्यालयीन,महिला व जेष्ठ नागरिक असे चार गट राहणार आहे. आयोजकांच्या वतीने चित्रकला स्पर्धेसाठी कागद,रंग काम साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी 4 वाजेपासून नोंदणी सुरू होणार आहे. चित्र काढणे व रंगवण्यासाठी 1 तास कालावधी राहणार आहे. स्पर्धा सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे चित्रकला स्पर्धेचे (painting and mehendi competition ) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट, महाविद्यालयीन,महिला व जेष्ठ नागरिक असे चार गट राहणार आहे. आयोजकांच्या वतीने चित्रकला स्पर्धेसाठी कागद,रंग काम साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी 4 वाजेपासून नोंदणी सुरू होणार आहे. चित्र काढणे व रंगवण्यासाठी 1 तास कालावधी राहणार आहे. स्पर्धा सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.(Nashik Municipal Corporation organises painting and mehendi competition to create awareness about voting)

प्रत्येक वयोगटातील विजेत्यांची नावांची घोषणा 14 मे 2024 रोजी करण्यात येईल या स्पर्धेसाठी मतदान जनजागृतीसाठी  1)उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा, 2) मी निवडणार माझा खासदार 3) माझे मत माझी जबाबदारी 4) वोट कर नाशिककर व मतदान जनजागृती या संबंधित चित्र काढणे हे या स्पर्धेसाठी राहणार आहे.

त्याच प्रमाणे स्वीप उपक्रमांतर्गत मनपाच्या वतीने सर्व विभागीय कार्यालयामध्ये गुरुवारी (दि.9) महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे (painting and mehendi competition ) आयोजन करण्यात आले आहे. 18 वर्षापुढील सर्व महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्व विभागीय कार्यालय, पश्चिम विभागीय कार्यालय,पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय,नवीन नाशिक विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय या सहा विभागीय कार्यालयांमध्ये दुपारी 3 वाजेपासून स्पर्धकांची नोंदणी केली जाणार आहे. तर सायंकाळी 4 वाजेपासून या मेहंदी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेहंदी स्पर्धेसाठी निवडणुकीची निगडित विषय निश्चित करण्यात आले आहे. त्या भारत निवडणूक आयोगाचा लोगो, स्वीप लोगो, वोटर ॲप हेल्पलाईनचा लोगो, सक्षम ॲप लोगो व मतदार जनजागृती संदर्भातील विषय या मेंहदी स्पर्धेत असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे 14 मे 2024 रोजी घोषित केली जाणार आहे. तरी या चित्रकला व मेहंदी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त तथा नोडल अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी