32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज!

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज!

आज नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर महायुतीचा नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसतांनाच आता नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणाऱ्या शांतीगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतीगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

आज नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर महायुतीचा नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसतांनाच आता नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde’s Shiv Sena) आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतीगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.(Shantigiri Maharaj files nomination from Shinde’s Shiv Sena in Nashik)

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून नुकतेच दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील महायुती आणि मविआच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

शांतीगिरी महाराज यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. पंरतु, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने नाशिकसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज विकत घेतले होते. याआधी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज दुसरा अर्ज भरला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी