31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना नाशिकमधील रामतीर्थ सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी त्यांचा नाशिककरांतर्फे जाहीर नागरी सत्कारही होणार आहे. स्वामी जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉनचे गौरांग प्रभू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार गोदाघाटावरील जुन्या भाजी पटांगणावर ३१ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रदान केला जाणार आहे.

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami Govinddevgiri Maharaj ) यांना नाशिकमधील रामतीर्थ सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार (Ramtirth Goda Rashtrajivan Puraskar )जाहीर झाला आहे. यावेळी त्यांचा नाशिककरांतर्फे जाहीर नागरी सत्कारही होणार आहे. स्वामी जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉनचे गौरांग प्रभू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार गोदाघाटावरील जुन्या भाजी पटांगणावर ३१ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रदान केला जाणार आहे.(Swami Govinddevgiri Maharaj conferred with first Ramtirth Goda Rashtrajivan Puraskar )

या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रामतीर्थ सेवा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, उपाध्यक्ष रामेश्वर मालानी, स्वागताध्यक्ष धनंजय बेळे, सचिव मुकुंद खोचे, जयंत गायधनी, राजेंद्र फड, विजय भातंबरेकर, वैभव जोशी, गुणवंत मणियार, कविता देवी, आशिमा केला, डॉ. अंजली वेखंडे, शिवाजी बोंदार्डे, सुर्यकांत राखे आदी उपस्थित होते. रामतीर्थ सेवा समितीतर्फे गेल्या तीन महिन्यांपासून गोदावरी नदीवर गोदाआरती सुरु आहे. या समितीतर्फे केवळ आरतीचा उद्देश मर्यादित न ठेवता कामाचा विस्तार करण्याचा संकल्प आहे. या भावनेतून समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार (Ramtirth Goda Rashtrajivan Puraskar )स्वामी गोविंददेवगिरी (Swami Govinddevgiri Maharaj ) यांना प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि थैली असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ३० मे रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० या दरम्यान स्वामी गोविंददेवगिरी (Swami Govinddevgiri Maharaj ) यांच्या हस्ते गोदाआरती होईल. त्यानंतर गोविंदगिरी यांचा रामसंदेश हा व्याख्यानाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी सकाळी ८ ते ११ दरम्यान स्वामी गोविंददेवगिरी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ऐन्द्री शांती, वेद पारायण, महावहन होईल. दुपारी ३ ते ५ या दरम्यान शांतीविधी महाहवन, दुपारी ५.३० ते ६.३० यावेळी गोविंददेवगिरी महाराज, स्वामी जितेंद्रनाथ महाराज व संत गौरांग प्रभू यांचे मार्गदर्शन होईल. ६.३० ते ७.३० या काळात गोदाआरती होईल. त्यानंतर ७.३० ते ९.३० याकाळात गोविंददेव गिरी यांना रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मानित केले जाईल. ३० ते ३१ मे दरम्यान संत देव मामलेदार पटांगणावर होणारे वसंत व्याख्यानमालेचे कार्यक्रम १ व २ जून रोजी होणार असल्याची माहिती जयंत गायधनी यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी