31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ शनिवारी (दि.१५) रोजी पहाटे खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४० ते ४५ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यातील 13 जणांचा या अपघातात मृत्यु झाला. या अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांच्या टीम कडून जाणून घेतली.

पहाटे हे प्रवासी पुण्याहून मुंबईकडे येत असताना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळली. सकाळी ही दुर्घटना घडल्याचे कळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य करणारे हायकर्स आणि आयआरबी रेस्क्यू टीममधील सदस्यांशीही फोनवरून संवाद साधून त्यांच्याकडून या दुर्घटनेची माहिती घेतली.

हे सुद्धा वाचा

मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणारा अहमदनगरचा; एटीएसने आवळल्या मुसक्या

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दोघांचा मृत्यू

खुशखबर : हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही !

त्यानंतर त्यांनी तातडीने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील असे जाहीर केले. त्यानंतर खारघर येथील रुग्णालयात जाऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा अपघात नक्की का आणि कोण्याच्या चुकीमुळे घडला ते जाणून घेतले. तसेच मदतकार्यात आलेली आव्हानेही समजून घेतली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच इतर सर्व अधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी