महाराष्ट्र

Ahmednagar News : हिंदू देवतांची विटंबना करून पुजाऱ्याला केली मारहाण

नगर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मी माता मंदिरात गणपती बाप्पाची आरती सुरू असताना काही समाजकंठकांनी एकत्र येत मंदिरावर तुफान दगडफेक केली. यावेळी त्यांनी गणपतीच्या मुर्तीची विटंबना केली, शिवाय पुजाऱ्यांना मारहाण सुद्धा केली. या संपुर्ण प्रकरणात दोन पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांकडून या घटनेचा तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. मोठ्या संख्येने एकत्र येत जमावानेच हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे. यावर सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पोखर्डी शेंडी गावात 4 सप्टेंबर रोजी लक्ष्मी माता मंदिरात गणपती बाप्पाची आरती सुरू होती. आरती सुरू असताना अचानक 40 ते 50 लोकांच्या जमावाने मंदिरावर दगडफेक केली, शिवाय मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ला गावातील पोलिस पाटील यांच्या मदतीनेच करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा…

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

Asia Cup 2022: खेळात चुक होणे ही स्वाभाविक गोष्ट; विराट कोहलीने केली अर्शदीप सिंहची पाठराखण

Rahul Gandhi : ‘त्या’ एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

या हल्ल्याविषयी सांगताना पुजारी म्हणाले, हल्ला करणारे सर्व लोक कागदोपत्री जातीने हिंदू आहेत पण त्यांच्या पूजा पद्धतीत बदल करून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे व आरती बंद करा असे स्थानिक लोकांना सांगत मारहाण केली सदरील हल्लेखोरानी नागापूर अरंगाव, जेउर शेंडी व पोखर्डी येथील सर्वांनी जमाव करत हल्ला केला, असे म्हणून त्यांनी हल्ल्याखोरांविषयी सांगितले.

या प्रकरणी स्थानिकांनी हल्लेखोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटतील मोर्चे, निदर्शने निघतील असा स्थानिक गावकऱ्यांकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

17 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

6 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago