31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeराजकीयRahul Gandhi : 'त्या' एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

Rahul Gandhi : ‘त्या’ एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

भाषणामधील एका चूकेमुळे राहूल गांधीना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ती चूक अशी होती की, भाषणाच्या वेळी राहूल गांधीनी 'किलो'च्या जागी चुकून 'लीटर' हा शब्द वापरला. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपने त्यांची शाळा घेतली.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘भारत जोडो यात्रा’ हे‍ अभियान सुरू केले आहे. गुजरातमध्ये या वर्षांच्या शेवटी विधासभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी रॅलीचे आयोजन केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँगेसने ‘भारत जोडो यात्रा’ करण्याचे ठरविले आहे. ही यात्रा 12 राज्यांतून जाणार आहे. ही यात्रा 150 दिवसांची असेल. ही पदयात्रा 3,500 किमीची असेल. या वर्षाच्या शेवटी गुजरात विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी गुजरात दौऱ्यावर होते.

काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी तीन महिने आगोदर प्रचार करणार आहेत. त्यामध्ये प्र‍ियंका गांधी वड्रा यांचा देखील समावेश आहे. राहूल गांधी 15 सप्टेंबरला काँग्रेस उमेदवारांची यादी जाहिर करणार आहेत. तर रविवारी झालेल्या रॅलीमध्ये राहूल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देशात असणाऱ्या वाढत्या महागाईवर जनतेचे लक्ष वेधले. देशात गॅस, तेल, दूध, आटा याचे भाव‍ दिवसागण‍िक वाढत आहेत. मात्र भाषणामधील एका चूकेमुळे राहूल गांधीना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ती चूक अशी होती की, भाषणाच्या वेळी राहूल गांधीनी ‘किलो’च्या जागी चुकून ‘लीटर’ हा शब्द वापरला. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपने त्यांची शाळा घेतली.

Rahul Gandhi : 'त्या' एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

राहूल गांधींनी काँग्रेसच्या काळातील जिवनावश्यक वस्तुंचे दर आणि भाजपच्या काळातील जिवनावश्यक वस्तुंच्या दराची तुलना केली. राहूल गांधीनी 2014 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडर 410 रुपये होता. तर आज त्याच गॅसचा भाव 1,050 रुपये आहे. तर पेट्रोलचा भाव 70 रुपये लीटर होता. आज 100 रुपयांच्या आसपास आहे. डीझेलचा भाव 70 रुपये लीटर होता. आज 90 रुपये आहे. मोहरीचे तेल 90 रुपये लीटर होते. ते आज 200 रुपये लीटर आहे. दूध 35 रुपये लीटर होते. ते आज 60 रुपये लीटर आहे. तर आटा 22 रुपये किलो होता. तो आज 40 रुपये आहे.

Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली ‘जागा’ !

 यावेळी राहूल गांधी आटा 22 लीटर होता असे चुकून बोलले. त्यांनी ती चुक लगेच सुधारली आणि ते आटा 22 रुपये किलो असे बोलले. मात्र त्यांच्या या चुकीच्या उच्चाराचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेण्यात आला. या टीकाकारांमध्ये भाजपच्या लोकांचा जास्त प्रमाणात सहभाग आहे. सोमवारी गुजरात दौऱ्यावर असतांना राहूल गांधीनी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमात भेट देऊन आशीर्वाद घेतला. राहूल गांधीनी 10 मेला गुजरातचा दौरा केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी