महाराष्ट्र

Bhrat Jodo Yatra : मोबाईल ‘मेड इन चीन’ नाही तर ‘मेड इन हिंगोली’ असला पाहिजे!

चीनमधून वस्तू आयात केल्या जातात यातून चीनचा फायदा होतो आणि हे माल विकणारे काही उद्योगपती गडगंज होत आहेत. हे मोफाईल व इतर वस्तू ‘मेड इन चीन, नाही तर मेड इन हिंगोली’ अशा झाल्या पाहिजेत, असे हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथे आजच्या पदयात्रेची चौक सभेत हजारो लोकांना संबोधित करताना म्हणाले. केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा, भीती पसरवत असून त्याच्या विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजपा व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण बनवत आहेत, असा घणाघात यावेळी राहूल गांधी यांनी केला.

राहूल गांधी म्हणाले, जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरूवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते पण नुकसाई भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटात माफ करतात पण शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खासदार राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा, आरएसएस, मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, भाजपाच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान झाले, हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार ‘हम दो हमारे दो’ चे आहे असे राहुलजी गांधी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, ‘दो सरकार में, दो बाजार में’, असा आवाज उमटला.

मोदी सरकार हिंसा, धर्म, जात यामध्ये जनतेला गुंतवून ठेवत आहे, मुख्य मुद्द्यांची चर्चाच होऊ दिली जात नाही. शिक्षण, आरोग्य सर्व काही खाजगी केले, सामान्य जनतेला हे परवडणारे नाही. तुम्ही शिक्षण, आरोग्यासाठी आवाज उठवला पाहिजे. गरिबांना मोदींच्या राज्यात स्थान राहिलेले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, बँक, शिक्षण, हाॅस्पिटल सर्व काही खाजगी उद्योगपतींच्या खिशात घातले आहे, असा घणाघात यावेळी राहूल गांधी यांनी केला.

हे सुद्धा वाचा :
Jitendr Awhad : जितेंद्र आव्हाड प्रकरणात रुपाली चाकणकर अॅक्शन मोडमध्ये; ठाणे पोलिस आयुक्तांना राज्य महिला आयोगाचे पत्र

Eknath Shinde : आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये, सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

Delhi Murder : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; त्यानं मात्र तिच्या शरिराचे 35 तुकडे केले

लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, मधले तरुण देशासाठी मरण्यास तयार असतात पण येथेही मोदींनी अग्निपथ योजना आणली. जवानांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे पण मोदी सरकार फक्त सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत आहे, हे जवान आव्हानाला कसे सामोरे जाणार ? जवानांना सेवेनंतर गावात सन्मान मिळत होता. 15-20 वर्ष देशासाठी दिल्यामुळे हा सन्मान मिळत असे पण अग्निपथमुळे सैन्यच कमजोर होईल. आता त्यांना या सेवेतही स्थैर्य नाही, चार वर्षानंतर घरी जा, अशी ही योजना आहे, यातून बेरोजगारी वाढवण्याचे काम होणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

प्रदीप माळी

Recent Posts

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

4 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

4 hours ago

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…

4 hours ago

भाडेकरूचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी…

5 hours ago

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas…

5 hours ago

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

10 hours ago