महाराष्ट्र

राजशिष्टाचार विभागाची प्रजासत्ताक दिनाची नियमावली जाहीर

टीम लय भारी

26 जानेवारी रोजी 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असून त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देशांचे पालन करून राष्ट्रीय उत्सव साजरा करावा, असे परिपत्रक राजशिष्टाचार विभागाने जारी केले आहे(Republic Day Rules of the Department of Etiquette Announced).

दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 09.15 वाजता आयोजित करण्यात यावा. हा समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे.राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोह करावे.जर राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.

विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. वेळेअभावी उपस्थित न राहिल्याने मुख्यालयी, विभागीय आयुक्त यांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी.

राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी(The national anthem ‘Jana-Gana-Man’ should be played while saluting the national flag on republic day).

सोशल मीडिया व डिजिटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/ संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रजासत्ताक दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतीवर किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी मुंबई व नागपूर येथे शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी.

कोरोनाविषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोद्धा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच निमंत्रित करावे(Republic Day program should be carried out in accordance with all the rules regarding social distance).

हे सुद्धा वाचा

यंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

Air India’s handover expected after Republic Day

उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग /कार्यालय प्रमुख यांनी द्यावा. विभागीय आयुक्त, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करणार आहेत.

राज्यपाल हे सकाळी मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमामध्ये विविध विभागातर्फे लोकाभिमुख योजनांच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे चित्ररथ व पोलीस महासंचालक यांचेकडून दरवर्षी सादर होणारे ध्वजसंचलन यावर्षी रद्द करण्यात यावेत.

काही ठराविक जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात :

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.
(ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये.
(क) पालकमंत्री यांच्या भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व यापुरताच मर्यादित असावा आणि त्यांनी कोणतेही राजकीय स्वरूपाचे भाषण करु नये. बलिदान केलेल्या हुतात्मांच्या तसेच देशाचा गौरव यापुरतीच भाषणे मर्यादित असावीत.

Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

15 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago