27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

यंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

टीम लय भारी
नवी दिल्ली;- भारताच्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथातून प्रत्येक राज्याचे वैशिष्टे सार्‍या देशासमोर दाखवण्यात येत येतात. यंदा राज्यातील ‘जैवविविधतेची मानके’ सार्‍या देशालाच नव्हे तर जगाला चित्ररथातून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील अनोखे सौंदर्य पाहायला मिळणार आहे.(Maharashtra This year the parade on Rajpath will be special)

भारतामधील जैवविविधता अनेकांना भुरळ घालते. महाराष्ट्रात ही जैवविविधता चार मुख्य भागांमध्ये दिसून येते. महाराष्ट्रामध्ये युनेस्कोची मान्यता असलेले ‘कास पठार’, प्राणी, पक्षी व अन्य जीवांसाठी राखवी ठेवलेले अभयारण्य, दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. त्यानुसार यंदाच्या चित्ररथामध्ये ही जैवविविधता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीत समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शवण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ तीन फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर ‘या’ मराठी चित्रपटासाठी झाले सज्ज

महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना जाहीर

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

Politics or procedure? What’s behind Bengal-Kerala-Modi govt Republic Day tableaux fracas

चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत आहे. तसेच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून, त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.

पश्‍चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्राच्याही चित्ररथाला परवानगी न दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्टीकरण दिले. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीत महाराष्ट्रातील कास पठारचा चित्ररथ असणार आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्राच्या चित्ररथाची एकूण १२ राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीत चित्ररथाची बांधणी सुरू असून, कामकाज अंतिम टप्प्यात आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी