35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रSambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ला उदंड प्रतिसाद; राज्यात अनेक ठिकाणी शाखांची...

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ला उदंड प्रतिसाद; राज्यात अनेक ठिकाणी शाखांची स्थापना सुरू

आता स्वराज्य संघटनेची सदस्य नोंदणी सुरू असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. १२ मे रोजी संभाजीराजे छत्रपतींनी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती.

संभाजीराजे छत्रपतींचे राज्यात स्वराज्य संकल्पना अभियान सुरू आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ‘स्वराज्य’ संघटनेची सदस्य नोंदणी आणि वेबसाईटचा शुभारंभ केला. राज्यातून स्वराज्य संघटनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळत असून, स्वराज्य संघटनेच्या शाखा देखील राज्यात ठिकठिकाणी स्थापन केल्या जात आहे. आता स्वराज्य संघटनेची सदस्य नोंदणी सुरू असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. १२ मे रोजी संभाजीराजे छत्रपतींनी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. तर ९ ऑगस्ट रोजी तुळजाभवानी मातेच्या चरणी संघटनेच्या बोधचिन्हाचे आणि ध्वजाचे पूजन करुन अनावरण केले होते.

जालना जिल्ह्यातून ७ ऑक्टोबर रोजी पासून संभाजीराजे यांच्या हस्ते स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घटन सुरू झाले. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संभाजीराजे छत्रपती यांनी भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करून भागातील मालखेडा, सुभानपूर, सिल्लोड रोड, जालना रोड आदी ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या शाखा स्थापन केल्या. या अभियानाला तरुणांपासून जेष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील महिला पूरुषांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जालन्यानंतर औरंगाबाद, आणि आता रायगड जिल्ह्यात स्वराज्य संकल्प अभियान सुरू असून रायगड जिल्ह्यात देखील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद संभाजीराजे छत्रपतीयांना मिळत असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : शिंदे गटाने सुचवलेले 3 पर्याय समोर! वाचा कोणकोणत्या गोष्टींचा केलाय समावेश

PM Kisan Yojana : किसान योजनेचा 12वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! अशी तपासा लाभार्थींची यादी

Sholay Film : धर्मेंद्रने जुना फोटो शेअर करत दिल्या अमिताभ बच्चनला शुभेच्छा! चाहते म्हणतायत ‘पुन्हा एकत्र…’

रविवारी (दि.९) रोजी रायगड जिल्ह्यात पनवेल येथे स्वराज्य संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. खारघर, कामोठे, करंजाडे या शहरी भागांत स्वराज्यच्या शाखांचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावळी करंजाडे येथे स्वराज्य संघटनेचा मेळावा पार पडला. दरम्यान राजगड जिल्ह्यातील आगरी कोळी, सिरवी समाजातील लोक देखील संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात स्वराज्य संघटनेत सहभागी होत आहेत.

‘स्वराज्यच्या माध्यमातून प्रभावी दबावगट’
पेण तालुक्यातील गणपतीची वाडी येथील मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोकणच्या विकासासाठी स्वराज्यच्या माध्यमातून प्रभावी दबावगट निर्माण करणार असून कोकणच्या सर्वांगीण विसासासाठी तसेच भूमिपुत्रांच्या न्यायासाठी सरकारदरबारी स्वराज्य संघटनेची ताकत प्रभावी दबावगट स्थापन करेल, कोकणला जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी, भूमिपुत्रांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होण्यासाठी स्वराज्य संघटना कार्यरत राहणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

ही आहे स्वराज्य संघटनेची पंचसुत्री
शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य ही स्वराज्य संघटनेची पंचसुत्री असून या पंचसुत्रीनुसार संघटना काम करणार आहे. समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना कार्य करणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी