31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर भडकले

शरद पवार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर भडकले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीपूर्वीच काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार प्रचंड वैतागले आहेत. अशा खोट्या बातम्या पसरवणा-या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच झापले. चुकीच्या बातम्या देत असाल तर उद्या पासून येथे येऊ नका असेही सुनावले. यामुळे पत्रकारांची चांगलीच पंचाईत झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवारांनी यत्रकारांपासून वाचण्यासाठी मी बारामतीला चाललो असं सांगून गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले. समन्वय समितीची बैठकही रद्द झाली. अशा प्रकाराच्या बातम्या दाखवण्यात आल्या. मात्र, शरद पवार यावर खूपच संतापले होते. त्यांच्या निवासास्थानी जमलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींसमोर पवार आले. तुम्हाला काही सांगितल्यानंतर तुमच्या पाच दहा गाड्या पाठिमागे असतात. त्यामुळे तुम्हाला अजित पवारांनी सांगितलं नाही. तुम्ही आता काय बातम्या दाखवता मी बघतो. असेही सुनावले.

तुम्ही खोट्या बातम्या दाखवत असाल तर मी उद्या पासून काहीही बोलणार नाही तुम्ही इथं येऊ नका असं हात जोडून पवारांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी सर्वच पत्रकारांनी नाही.. नाही.. करत सॉरी.. सॉरी केलं. आणि पवार घरामध्ये निघून गेले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी