पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारचा ‘बंगळुरू मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ म्हसवड येथेच होणार होता. तो तेथून रद्द करून कोरेगाव येथे नेण्याचा जो काही निर्णय झाला आहे, त्यात माझा कोणताही सहभाग नाही. माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकल्प स्थलांतरीत झाला आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘लय भारी’शी बोलताना केला. ‘लय भारी’ने आज ‘शरद पवारांनी आणलेल्या प्रकल्पाला रामराजे नाईक निंबाळकर यांचा कोलदांडा’ या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने निंबाळकर यांनी आपली बाजू मांडली आहे.

केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत आहे. औद्योगिक कॉरिडॉर सुद्धा केंद्र सरकारच्याच अखत्यारित आहे. जयकुमार गोरे हे सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे गोरे यांनी कोरेगावला गेलेला प्रकल्प बदलून परत म्हसवडला आणण्याची धमक दाखवावी, असे आव्हान सुद्धा निंबाळकर यांनी दिले.

मुळात म्हसवडमध्ये हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रभाकर देशमुख यांनी प्रामाणिकपणे व कष्ट घेऊन प्रयत्न केले होते. पण त्या अगोदरपासूनच कोरेगावमध्ये हा प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. परंतु हा प्रकल्प माणमध्ये करायचा आहे, असे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले होते. म्हसवडमध्ये हा प्रकल्प होण्यासाठी प्रभाकर देशमुख आणि अजितदादा या दोघांची भूमिका फार मोठी होती. अजितदादांनी मला सांगितल्यामुळे हा प्रकल्प कोरेगावमध्ये करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही केव्हाच सोडून दिले आहेत, असेही निंबाळकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Chandrakant Patil : पुण्याच्या गर्दीत चर्चा रंगली चंद्रकांतदादांची, वाचा काय घडलं…

Sharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे – शरद पवार

Jayant Patil : शेतकरी चिंताग्रस्त आहे पण सरकारने एक ‘दमडी’ दिली नाही – जयंत पाटील

एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी म्हसवडचा प्रकल्प कोरेगावला स्थलांतरीत केला आहे. त्याबाबतची इतिवृत्तेही उपलब्ध आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हा प्रकल्प स्थलांतरीत करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठविले आहे. इतक्या घडामोडी होत असताना जयकुमार गोरेंनी तिकडे दुर्लक्ष का केले ? हा प्रकल्प स्थलांतरीत होऊ नये यासाठी जयकुमार गोरे यांनी त्यांच्याच सरकारवर लक्ष ठेवायला हवे होते, असेही निंबाळकर म्हणाले.
माण – खटाव तालुक्याविषयी माझ्या मनात यत्किंचितही विरोध नाही. म्हसवडमध्ये आमच्या शाळा आहेत. स्थानिक लोकांचे कल्याण व्हावे अशी माझीही भूमिका असल्याचे ते म्हणाले.

प्रभाकर देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना हा प्रकल्प म्हसवडला करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आम्ही कोरेगावमध्ये महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या एमआयडीसीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. छोटी एमआयडीसी उभी राहिली तरी चालेल अशी आमची भूमिका होती. एवढेच नव्हे तर अगदी खासगी एमआयडीसी उभारण्याचीही आम्ही तयारी ठेवली होती, याकडेही निंबाळकर यांनी लक्ष वेधले आहे.

तुषार खरात

Recent Posts

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

26 mins ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

13 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

13 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

14 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

14 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

20 hours ago