महाराष्ट्र

जर्मनीसोबतचे मैत्रिपूर्ण संबंध कायम राहतील : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई : भारतातील जर्मनीचे महावाणिज्यदूत जर्गन मो-हार्ड यांचा सेवा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. यानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याद्वारे महाराष्ट्रीयन पद्धतीने मो-हार्ड यांचा सपत्निक सत्कार केला. या सोहळ्याला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध देशांतील वाणिज्यदूत, उद्योजक तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (Subhash Desai : Friendly relations with Germany will continue)

जर्गन मो-हार्ड २०१६ पासून भारतात सेवेत होते. मुंबई कार्यालयात सेवा बजावत असताना त्यांचे राज्य शासन आणि उद्योग मंत्री कार्यालयासोबत मैत्रिपूर्ण संबंध राहिले. इंडो-जर्मन संकल्पना पुढे नेण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. जर्मनीतील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या कंपन्यांच्या मोठा वाटा आहे. दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक संबध वृद्धींगत करण्याकामी वाणिज्यदुतांनी महत्वाची भूमिका बजावली. राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी जर्मनीतील कंपन्यासह महावाणिज्यदूत मो-हार्ड यांनी वेळोवेळ सहकार्य केले.. त्यांची मैत्री कायम स्मरणात राहील, अशा भावना श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या.

कोविड काळात जर्मनीतील कंपन्यांनी राज्य शासनला सर्व सहकार्य दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. मो-हार्ड यांचे महाराष्ट्र आणि मुंबईसोबत कौटुंबिक नाते जुळले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतच स्थायिक व्हावे, असा सल्ला दिला.महावाणिज्यदूत जर्गन मो-हार्ड यांचा श्री, देसाई यांनी हिमरू शाल देऊन सत्कार केला तर त्यांच्या पत्नी पेट्रो यांचा श्रीमती सुषमा सुभाष देसाई यांच्या हस्ते भारतीय परंपरेची ओळख सांगणारी पैठणी साडी दिली.

भारतात आणि मुंबईत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. जर्मन आणि भारताचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. यापुढेही ते कायम राहतील. मी सेवेतून निवृत्त होत असलो तरी इंडो जर्मन नात्यातून कधीही निवृत्त होणार नाही. उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकदारांना येथील शासन भविष्यात देखील पूर्वीप्रमाणे सहकार्य करेल. भारतातील विशेषतः महाराष्ट्र शासनाने केलेल सहकार्य नेहमीच स्मरणात राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कृष्णा मोहन (बीएएसएफ), विस्टन पेरेरा, मोहित रैना, अनुपम चतुर्वेदी, डीएचएलचे संचालक सुब्रमण्यम्, सिमेन्सचे सुनील माथूर, मायकल ब्राऊन( ऑस्ट्रेलियाचे सह वाणिज्यदूत), साऊथ कोरियाचे यांग ओग किम, सिंगापूरचे चेंग मिंग फुंग आदी उपस्थित होते. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआय़डीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा :

दावोस जागतिक आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला गती मिळेल सुभाष देसाई यांचे आश्वासन

मंत्री सुभाष देसाईंचा कल्पक उपक्रम, निर्माण केले पहिले ‘मधा’चे गाव

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा !

सुपारी सभा घेत भोंगा कमळाला किती त्रास देतोय हे पुढील काळात समजेल : सुभाष देसाई यांचा मनसेसह भाजपला टोला

 

Pratiksha Pawar

Recent Posts

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

24 mins ago

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

7 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

7 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

7 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

8 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

8 hours ago