मुंबई

दावोस जागतिक आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला गती मिळेल सुभाष देसाई यांचे आश्वासन

जागतिक आर्थिक परिषदेला आजपासून दावोस येथे सुरूवात झाली. या परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

Anil Anna Gote advt
टीम लय भारी

दावोस जागतिक आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला गती मिळेल सुभाष देसाई यांचे आश्वासन

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेला कालपासून दावोस येथे सुरूवात झाली. या परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र (Davos World Economic) दालनाचे उद्घाटन करण्यात आले. (Davos World Economic Conference development in Maharashtra)

जागतिक आर्थिक परिषदेचे (Davos World Economic) आयोजन दि. २२ ते २६ मे २०२२ या कालावधीत दावोस, स्वित्झर्लंड येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर, महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे हे उपस्थित होते.

भारताच्या ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र अग्रणी असून राज्याने एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातून राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योगपती व तज्ज्ञ मंडळी दावोस, स्वित्झर्लंड येथे एकत्र आली आहेत. त्यांच्या गाठी भेटी व सामंजस्य कारारांमुळे राज्यातील गुंतवणुकीला व आर्थिक विकासाला (Davos World Economic)चालना मिळणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन पार्टनरशिप यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.२०१८ मध्ये एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. पर्यावरण रक्षण व संतुलित विकास साधण्यासाठी कृतिशील योजना राबवित (Davos World Economic) असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ह्या प्रसंगी सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

State teams pitch tent at Davos for World Economic Forum

पुणे ग्रामीण पोलिसांनी रोखले तब्बल ११ बालविवाह सुप्रियताईंनी केले कौतुक !

आरक्षणासह ओबीसी समाजाच्या सर्व समस्या सोडवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close