मुंबई

मंत्री सुभाष देसाईंचा कल्पक उपक्रम, निर्माण केले पहिले ‘मधा’चे गाव

देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला मान मिळाला. तसाच मान आता देशातील पहीले मधाचे गाव म्हणुन याच महाबळेश्वमधील मांघर या गावाचे नाव लवकरच जाहीर झाले आहे.

टीम लय भारी

मुंबई : देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला मान मिळाला. तसाच मान आता देशातील पहीले मधाचे गाव म्हणुन याच महाबळेश्वमधील मांघर या गावाचे नाव लवकरच जाहीर झाले आहे. राज्य शासनाच्या राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून मधाचे गाव (First honey village) ही महत्वपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहे. (first honey village created initiative by Subhash Desai )

मंत्री सुभाष देसाईंचा कल्पक उपक्रम, निर्माण केले पहिले 'मधा'चे गाव

मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे (First honey village) संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढ झाल्याचे आढळून आले आहे.


मधाचे गाव म्हणुन मांघर हेच गाव का या बाबत खादी ग्रामोदयोगचे संचालक वसंत पाटील यांनी सविस्तर माहीती दिली. या गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते. गावातील ८० टक्के लोकसंख्या मधमाशापालनाचा व्यवसाय करतात. असे सांगुन या गावात कोणकोणते प्रकल्प राबविले जातील या बाबतचा (First honey village) आराखडा पाटील यांनी सादर केला.

मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वराला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहीले जाते. मधमाशांच्यामुळे पिक (First honey village) उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.

बिपीन जगताप यांनी ही मार्गदर्शन करताना सांगितले की, मधाचे गाव ही संकल्पना अंशु सिन्हा यांची असून राज्यातील मधमाशापालनाला उपयुक्त भागात राबविण्यात येणार आहे. मधाचे गाव ही संकल्पना गावांना स्वयंपूर्ण करण्याबरोबरच निसर्ग संवर्धन करणारी आहे. कार्यक्रमात स्थानिक मधपाळांना (First honey village) मधपेट्या वाटप करण्यात आले. गावाची पाहणी करण्यात आली.

देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला (First honey village) जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

हे सुध्दा वाचा :- 

Mad Honey: Nepal’s famous honey that makes people hallucinate

मुंबई महानगरपालिका आडनाव बघून कारवाई करते आशिष शेलारांचा आरोप

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close