महाराष्ट्र

दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण येतेय, अन्यायग्रस्त एका कुटुंबाची कैफियत

टीम लय भारी

पुणे :- पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपालिकेसमोर भांडवलकर कुटुंबियाच्या सुरू असलेल्या चक्री उपोषणाला एक महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील अजून भांडवलकर कुटुंबीयांनी केलेल्या उपोषणाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या कुटुंबाला न्याय न मिळाल्यामुळे त्यांना दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण आली (The late Vilasrao Deshmukh was remembered).

स्वत:ची जागा परत मिळवण्यासाठी भांडवलकर कुटुंबाना उपोषण करावे लागत आहे. परंतु एक महिना उलटून गेला तरी देखील त्यांच्या उपोषणाची कोणीही दखल घेतली नाही. सदरच्या जागेचेमूळ मालक दगडु शंकर भांडवलकर यांच्या वारसांना परत मागण्याचा अधिकार आणि हक्क आहे.

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका

तसेच 1999 ते 2004 साली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे निष्ठांवत नेते तसेच दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचे विश्वासू सुनिल आसवलीकर यांनी तेव्हा यांची दखल घेतली. सुनिल आसवलीकर यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषद सदस्य अरविंद रणपिसे यांनी मिळून भांडवलकर कुटुंबीयांची आणि विलासराव देशमुख यांची भेट घडवून आणली (He met the Bhandwalkar family and Vilasrao Deshmukh).

1999 ते 2004 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांनी या प्रकरणाचा संपूर्ण चौकशी करण्यासाठी संबंधित भांडवलकर कुटुंबियांना मुंबईत बोलावून घेतले होते. तेव्हा भांडवलकर कुटुंबीचे सदस्य तुकाराम भांडवलकर यांच्यासोबत रामोशी समाजातील काही नेते मंडळी हे मुंबईला विलासराव देशमुख यांना भेटायला गेले होते.

विलासराव देशमुख

बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

COVID-19: More relaxations for shops in 25 Maharashtra districts; malls allowed to operate

विलासराव देखमुख यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी मधुकर कोकटे होते. तेव्हा विलासराव देशमुख यांनी मधुकर कोकटे यांना सुचना दिल्या आणि त्यांनी या कुटुंबाना न्याय देण्यास सांगितले. तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश विलासराव देशमुख यांनी मधुकर कोकटे यांना दिले होते (Vilasrao Deshmukh had given it to Madhukar Kokte).

अशा न्याय देणाऱ्या लोकनेत्याची म्हणजेच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज देखील 14 वर्षेनंतर पुन्हा आठवण येते आहे असे भांडवलकर कुटुंबीयांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

17 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

17 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

18 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

18 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

18 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

19 hours ago