28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजनारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

टीम लय भारी
नवी दिल्ली : नारायण राणे नुकतेच केंद्रात मंत्री झाले. लघु व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्या अनुषंगाने छोट्या उद्योगांना ‘टॉनिक’ देण्यासाठी त्यांनी पाऊले टाकायला सुरूवात केली आहे. (Narayan rane to look after incense stick’s business)

Narayan rane
नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

एरवी ‘अगरबत्ती’ व्यवसाय हा सरकारच्या खिजगिणतीतही नसतो. पण या दुर्लक्षीत व्यावसायिकांच्या कल्याणासाठी राणे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकले आहे.

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका

‘लॉकडाऊन’च्या नियमावलीत थोडे बदल करून सुधारित नियमावली जाहीर

‘अगरबत्ती’ उद्योगासंदर्भात त्यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत अगरबत्तीच्या उत्पादन प्रकल्प योजनेचा आढावा घेण्यात आला. योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ व चांगली करणे हा या बैठकीचा हेतू होता. त्यादृष्टीने अगरबत्ती उत्पादन योजनांकडे पुन्हा एकदा लक्ष पुरविले गेले. असे त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून सांगितले.

अगरबत्ती म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या घरात व हिंदुस्थानच्या सर्वच्या सर्व मंदिरात वापरली जाणारा जिन्नस आहे.
अगरबत्ती चा व्यवसाय लहान स्वरूपात जरूर असेल पण त्याची व्याप्ती ही संपूर्ण भारतभर आहे.

अगरबत्तीच्या वापराचे काही फायदे आहेत तसेच गंभीर तोटे सुद्धा आहेत, परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हिंदुस्थानातील प्रत्येक घरात अगरबत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

अगरबत्तीचे फायदे

जय महाराष्ट्र की होम मिनिस्टर – निलेश राणे

After 11 weeks of decline, Covid cases see 7.5% surge Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/84958409.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

अगरबत्तीचा देव्हाऱ्यातील वापर हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
अगरबत्तीची धूप कीटकांना दूर ठेवते व त्यांच्यापासून होणारे संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरते
अशांत मनाला शांत करण्यास अगरबत्तीचा काहीसा उग्र पण सुगंधित गंध मदत करतो
अगरबत्तीचा सुगंध लोकांमधील चिंता आणि तणाव कमी करण्यासाठीही प्रभावी आहे असे म्हटले जाते.
निद्रानाश आणि झोपेचे इतर विकार रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अगरबत्ती होय.

वास्तविक पाहता अगरबत्तीचे मूळ शोधल्यास हे नव्या युगातील आहे असे समजते. अरबांमार्फत मुस्लिम बांधवांनी अगरबत्तीची ओळख भारतीयांना करून दिली. आपल्या प्रियजनांच्या कबरीजवळ सुगंधित वातावरण असावे म्हणून ते अगरबत्ती जाळीत. त्याचे अंधानुकरण करत सर्व हिंदूंनी अगरबत्तीला आपल्या देव्हाऱ्यात आणून ठेवले. देवळांतून देव्हाऱ्यांतून अगरबत्त्यांना सकाळ संध्याकाळ उत येत असतो. हिंदू शास्त्रानुसार कोठेही पुराणांत अगरबत्तीचा उल्लेखही येत नाही. यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत.

अगरबत्तीचे तोटे

‘धूप दीप नैवेद्यम समर्पयामि’ मधून अगरबत्ती ऐवजी धूप वापर करावा असे शास्त्र सांगते. अगरबत्ती बनविण्यासाठी बांबू च्या लाकडाचा वापर केला जातो. बांबू मध्ये नायट्रोजन चे प्रमाण जास्त असते. बांबूचे लाकूड जाळल्यास त्यातून वायुरूपणे निघणारी नायट्रोजन द्रव्ये शरीरास हानिकारक असतात. इतकेच काय तर मृतदेह दहन करताना सुद्धा बांबू चा वापर करणे हिंदू सांस्कृतीत निषिद्ध मानले आहे.
अगरबत्तीच्या धूरांमध्ये घातक कण असतात जे आरोग्यास गंभीर धोका पोहोचवू शकतात. या धूरांमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणामुळे ब्रोन्कियल नळ्याना इजा पोहोचते, या नळ्यांतून फुफ्फुसांमध्ये हवा जाते. यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आणि दमा होऊ शकतो.
अगरबत्तीच्या काड्यांमध्ये सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजनचे ऑक्साईड आणि फॉर्मल्डेहायडचे कण तसेच वायूच्या स्वरूपात असतात, ज्यामुळे नियमितपणे वापर केल्यास सीओपीडी आणि दम्यासारख्या दाहक प्रतिक्रिया निर्माण होतात. फुफ्फुसांद्वारे श्वास घेतलेल्या धुराचे प्रमाण सिगारेटच्या धुरामूळे होणाऱ्या हानीइतकेच असते.
उदबत्तीच्या दैनंदिन वापरामुळे दिसत असलेली सामान्य न्यूरोलॉजिकल लक्षणे म्हणजे डोकेदुखी, एकाग्र होण्यात अडचण आणि विसराळू पणा. अगरबत्ती जाळल्याने घरातील वायू प्रदूषण होते, ज्यामुळे रक्तात कार्बन मोनोऑक्साइड (CO) आणि नायट्रोजन ऑक्साईड (NOx) चे प्रमाण वाढते. या वायूंच्या एकत्रित येण्यामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम करून न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात.

अगरबत्ती जाळल्याने श्वसनमार्गाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की अगरबत्तीच्या दीर्घकालीन वापरामुळे श्वसनमार्गाच्या वरच्या भागाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. हे पुढे सिद्ध झाले की धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत सतत अगरबत्ती लावणाऱ्यांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे.
अगरबत्तीसाठी ज्या सुगंधी द्रव्याचा वापर केला जातो त्यात जस्त, लोह व मॅग्नेशियम या धातूंचा वापर केलेला असतो. त्यांच्या धुराने किडणीवर तसेच हृदयावर परिणाम होतात. यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे आजार (cardiovascular disease) होण्याची शक्यता जास्त असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी