28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeएज्युकेशनबारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

टीम लय भारी

मुंबई:- बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार (ता.3) दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणाऱ्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या साईट्स लॉन्च केल्या आहेत (Class XII examination The result will be announced tomorrow).

दहावीच्या निकालावेळी सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवर उद्या जाहीर होणाऱ्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या साईट्स लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे एकाच संकेतस्थळावर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सोपे जाणार आहे.

‘लॉकडाऊन’च्या नियमावलीत थोडे बदल करून सुधारित नियमावली जाहीर

भारत सोडून दुबईला शिफ्ट होणार आहे नवाझुद्दीन सिद्दीकीचे कुटुंब

निकाल या संकेतस्थळांवर पाहा

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in. 

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

Maharashtra 12th result 2021 to be declared on mahresult.nic.in Tuesday

Class XII examination The result will be announced tomorrow
बारावीचा निकाल जाहीर होणार

असे मिळणार गुण

2021 मध्ये बारावीच्या परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व 10 वीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे बारावीच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध राहतील (Considering the merit, the result of the examination is as per the procedure prescribed by the board).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी