महाराष्ट्र

क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे पत्रीसरकार

टीम लय भारी
3 ऑगस्ट 1900 साली भारतात एका असामान्य व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. पारतंत्र्यात असताना, आपल्या एकूण एक हालचालींवर निर्बंध असताना आणि पोलीस सतत मागावर असताना भूमीगत राहून ज्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली, व स्वतःचे लष्कर स्थापन केले त्या नाना पाटील यांची आज जयंती. (Nana patil, a freedom fighter and great politician was born on August 3, 1900)

नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते. नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता नंतरच्या काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केला. व प्रतिसारकारात मोठे योगदान दिले.

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

‘लॉकडाऊन’च्या नियमावलीत थोडे बदल करून सुधारित नियमावली जाहीर

सातारा सांगली येथील ग्रामीण भागात तरी ब्रिटिशांचे सरकार नाममात्र च होते. त्या काळात तेथील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर नाना पाटील यांची दहशतच होती. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांनी आपले काम चालू ठेवले होते.

त्यांचा जन्म येडे मच्छिंद्र गावी वाळवा तालुक्यात झाला होता. शिक्षण होताच त्यांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी पहिली परंतु मुळचाच राजकारणी स्वभाव आणि चळवळींची ओढ यामुळे ते सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले. येथूनच त्यांचा स्वातंत्र्यलढ्यशी संबंध आला.

प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे प्रतिसरकारचा प्रचार होत होता.

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका

Nana Patole’s statement was misconstrued, taken out of context: Congress

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारातून वेगवेगळ्या दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती आणि या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या जवळजवळ दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या हत्याराबरोबरच पिस्तूल चालवण्याचे व बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण सुद्धा या जवानांना दिले गेले होते.

नाना पाटील यांच्या प्रतिसरकारला लोक पत्रीसरकार असे संबोधित. त्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही म्हणत की नाना पाटील ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या पायाला पत्रा ठोकत म्हणून पत्री सरकार तर काहींच्या मते त्याकाळी शिक्षा द्यायची झाल्यास उघड्या पायांच्या तळव्यांवर लाठीने वार करीत त्यास पत्री ठोकणे असे म्हणत. व नाना पटीलांचे सरकार अशी शिक्षा देत असे म्हणून. अशा विविध अफवा प्रतिसरकार बाबत होत्या.

वयाच्या विसाव्या वर्षांपासून त्यांच्या तुरुंगाच्या वाऱ्या सुरू झाल्या. 8-10 वेळा तुरुंगात गेल्यानंतर ते भूमिगत झाले व भूमिगत राहून कारभार हाताळू लागले. 1946 ला स्वातंत्र्य मिळणार ही खबर पक्की झाल्यानंतरच ते कराड येथे प्रकट झाले. मध्यंतरी सरकारने त्यांचे घरदार लुटले होते व जमीन हिसकावून घेतली होती. तरीही ते बधले नाहीत. या काळात त्यांच्या आईचा मृत्यूही झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नाना पाटलांनी आपले लोकसेवेचे काम सुरू ठेवले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले.

त्यानंतर १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. व वयाच्या 76 व्या वर्षी डिसेंबर 6 रोजी त्यांची प्राणज्योत वाळवा येथे असताना मालवली.

Mruga Vartak

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

5 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

6 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

8 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

8 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

9 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

9 hours ago