महाराष्ट्र

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालणा देणारा अर्थसंकल्प : उज्ज्वला हाके

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बुधवारी (दि.१) रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ (said Union Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीयांसाठी सर्वसमावेशक असल्याचे मत भाजप (BJP) वैद्यकीय आयुर्वेद आघाडी प्रदेशाध्यक्षा व भाजप भटके विमुक्त महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा डॉ. उज्वला हाके (Ujjwala Hake) यांनी व्यक्त केले.

डॉ. उज्ज्वला हाके म्हणाल्या, हा अर्थसंकल्प सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना कर रचनेत दिलासा देणारा आहे. तसेच शेती, पशुपालन, मस्त्य, दुग्ध व्यवसायांना २० लाख कोटींची कर्जाची तरतूद केली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. इतिहासात प्रथमच ८१ हजार महिला बचत गटांचे सबलीकरण करण्याचे धोरण या अर्थसंकल्पात मांडले आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना आखली आहे. आदिवासी, वंचित घटकांतील पारंपरिक व्यवसाय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित केल्या असल्याचे देखील उज्ज्वला हाके म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

रघुनाथ माशेलकर, प्रा. संजय धांडे, वसंत काळपांडे यांनी सांगितले अर्थसंकल्पातील फायदे-तोटे

तसेच १५७ नवीन नर्सिंग कॉलेजेस उभारणी करण्याचा देखील निर्णय़ या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला आहे. शुन्य ते ४० वर्षापर्यंत युनिव्हर्सल फ्री हेल्थ स्क्रिनिंग, सिकल सेल ऍनिमिया निर्मूलन, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य देणारा असा हा अर्थ संकल्प असून एकूणच देशाला विकासाच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्पाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रीया उज्ज्वला हाके यांनी व्यक्त केली.

प्रदीप माळी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago