महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case: सीआयडीकडून विनायक मेटे अपघात प्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वर शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस महासंचालकांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडीने या प्रकरणी तपास सुरू केला होता. सीआयडने कलम 304 (2) नुसार मेटे यांच्या वाहनाचे चालक एकनाथ कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला  आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू नंतर त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मेटे यांच्या भाच्याने वाहन चालक कदमवर देखील संशय व्यक्त करून चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पोलीस महासंचालकांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीआयडीने या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर सीआयडीने मेटे यांचे वाहन ज्या ज्या ठिकाणी गेले तेथील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली होती. त्याशिवाय आयआरबीचे अभियंते आणि टेक्नीकल अभियंत्यांचे देखील एक पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून देखील सीआयडी या अपघाताबाबत मते जाणून घेत होती.

दरम्यान सीआयडीने तपासणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेटे यांचा चालक एकनाथ कदम हा ताशी 120 ते 140 इतक्या भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून आले. या फुटेजमध्ये कदम हा ज्या ठिकाणी मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणी भरधाव वेगात गाडी चालवत एकदम गाडी उजव्या लेनमध्ये वळवत ओव्हरटेक करताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सीआयडीने रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्या वाहनाचा चालक एकनाथ कदम याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १४० ते १२० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्याने कार तिथे घातली. आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे समोर आलं आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे सुद्धा वाचा :
Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

Sachi Vaze : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावर शुक्रवारी फैसला

Bharat Jodo Yatra : तिरंगा श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार, कोणीही अडवू शकत नाही : राहुल गांधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झाला होता अपघात
१४ ऑगस्ट २०२२ रोजी काही कामानिमित्त विनायक मेटे मुंबईकडे येत असताना पहाटे पाच वाजता त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. यावेळी त्यांना तातडीने मदत न मिळाल्याचा देखील आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर विनायक मेटे यांचे समर्थक, तसेच मराठा समाज आक्रमक झाला होता. विनायक मेटे यांचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना देखील या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता सीआयडीने या प्रकरणी तपास करत मेटे यांच्या वाहनाचा चालक एकनाथ कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

19 mins ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

30 mins ago

विजय करंजकर म्हणाले लढणार, पण त्या व्हिडिओची चर्चा

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी…

41 mins ago

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

7 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

7 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

8 hours ago