मंत्रालय

Ajit Pawar : ‘अजितदादा म्हणतात, तुला काही कळत नाही…’

‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ खाते होते. त्यावेळी ते विविध मतदारसंघांसाठी मुबलक निधी द्यायचे. आमदार हा सत्ताधारी पक्षातील आहे की, विरोधी पक्षातील हे अजितदादा पाहायचे नाहीत. सरसकट सगळ्यांना निधी द्यायचे. विरोधी पक्षातील आमदारांना कशाला निधी द्यायचा, असे आम्ही म्हणायचो. यावर अजितदादा म्हणायचे, अरे सुनील तुला काही कळत नाही. लोकांमधून निवडून आलेले हे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या कामांसाठी निधी द्यायला हवा. पण अजितदादांसारखा मनाचा मोठेपणा आताच्या सरकारकडे नाही, अशा शब्दांत आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेतील पुरवणी मागण्यांच्या चर्चेवेळी ते बोलत होते.

आताचे सरकार सत्तेवर आले, आणि त्यांनी लगेच मागील सरकारची कामे थांबविली. पुरवणी मागण्यांमध्ये तर आमच्या मतदारसंघांसाठी एका रूपयांची तरतूद केलेली नाही. आम्हाला निधी देवू नका. परंतु मागील सरकारने मंजूर केलेली कामे तरी हिरावून घेवू नका, असे आर्जव शेळके यांनी केले.

आमच्या मतदारसंघात होणाऱ्या कामांचे श्रेय तुम्हीच घ्या. भाजप व शिंदे गटाचे मोठमोठे फलक लावा. परंतु कामे थांबवू नका. त्यामुळे गोरगरीब व सामान्य लोकांचे नुकसान होत आहे. माझ्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांसाठी मंजूर झालेली कामे सुद्धा आपण रद्द केलीत, अशी नाराजी शेळके यांनी या वेळी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session 2022 : अंबादास दानवे कडाडले; शिंदे सरकारने बुलेट ट्रेनसाठी पैसे दिले, पण संभाजी – शाहू महाराजांच्या स्मारक रद्द केले

Maharashtra Assembly Session : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांनी रस्त्यांची दुरावस्था वेशीवर टांगली

Jayant Patil : जयंत पाटील म्हणाले, मी सांगितलेले काम एकनाथ शिंदे ऐकतातच

अजित पवार यांनी घेतले तोंडसुख

प्रणिती शिंदे बोलत असताना बहुतांश मंत्री बाहेर निघून गेले होते. त्यावर आक्षेप घेण्यासाठी अजित पवार उभे राहिले. पण एका सदस्याने बसून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार चांगलेच संतापले.
‘मी असा झापेन की, तुमचा अपमान होईल’ अशा शब्दांत अजित पवारांनी संबंधित सदस्याला समज दिली. सभागृहात महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. चार विभागांची चर्चा सुरू आहे. पण या विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना काही विषय हाताळायला दिले आहेत. पण संजय राठोड सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत. रवींद्र चव्हाण उपस्थित नाहीत. आम्ही सुद्धा मंत्री होतो. पण आम्ही पूर्ण दिवसभर सभागृहात थांबायचो, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्षेप नोंदविल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले. संजय राठोड आताच बाहेर गेले आहेत. जाताना ते सांगून गेले आहेत. मी त्यांना निरोप देवून लगेच बोलावून घेतो. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सभागृहातील चर्चेचे मुद्दे मी नोंदवून घेत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

दुसऱ्या एका चर्चेच्या अनुषंगाने अजित पवारांनी पुन्हा सभागृहातील सदस्यांवर तोंडसुख घेतले. सभागृहात बसून कुणीही बोलू नये. बोलायचे असेल तर उभे राहूनच बोलले पाहीजे. याविषयी सगळ्यांचे एकमत झालेले असताना काही सदस्य अजूनही बसूनच बोलतात. बसून बोलल्यामुळे ‘आ..रे..ला का…रे’ होते. एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही ‘आ…रे..ला का..रे’ करतो. शिंदे यांचे हे म्हणणेच खालपर्यंत झिरपत असल्याची खिल्ली अजित पवार यांनी उडविली.
अजित पवार यांच्या या सुचनेच्या अनुषंगाने तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी सुद्धा सदस्यांना सुचना केल्या. खाली बसून कुणी बोलू नका. काहीही कॉमेंटस् करू नका, अशा सुचना शिरसाठ यांनी केल्या.

तुषार खरात

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

2 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

2 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

3 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

6 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

7 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

7 hours ago