33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Session : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांनी रस्त्यांची...

Maharashtra Assembly Session : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांनी रस्त्यांची दुरावस्था वेशीवर टांगली

शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई महामार्गावर मृत्यू झाला. ज्यावर आज पावसाळी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या चर्चेत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेत विधिमंडळात रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

मागील आठवड्यात पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचे निधन झाले. त्यानंतर महामार्गावरील खराब रस्ते, बेशिस्त वाहतूक, वाहन चालक वाहन चालवताना लेन ची शिस्त पाळत नसल्याचे मुद्दे समोर आले. यावर आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले. महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त तीन तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का ? किंवा त्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून शिंदे-भाजप सरकारला विचारण्यात आला आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचे 14 जून ला मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी अपघाती निधन झाले. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतुकीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. याबाबत आज पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी चर्चा करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताच्या उपडेट विधिमंडळात मांडल्या. या चर्चेत बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेत सरकारसमोर काही प्रश्न देखील उपस्थित केले.

खराब महामार्ग व त्यावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्त वाहतूक पहावयास मिळते, लेनसी शिस्त पाळली जात नाही. आपण सुरक्षित वाहन चालवत असलो तरी समोरचा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध वाहन चालवत असेलच असे नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. यावर सरकारकडे काही ठोस धोरण असले पाहिजे. जनजागृती, प्रशिक्षण याबरोबरच रस्ते व्यवस्थेत असले पाहिजेत हेही तितकेच महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

Amol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी दिले उत्तर

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

महामार्गावरील खड्डे बुजवले पाहिजेत. बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-मुंबई महामार्गाचे उदाहरण देत या रस्त्यांवरून वाहन चालवताना टायर फुटतात, अत्यंत निकृष्ट रस्ता आहे. त्यामुळे तीन तासांच्या प्रवासाला सहा तास लागतात. प्रवासही जीव मुठीत घेऊन करावा लागतो. या महामार्गावरचे टोल वसुल केले जातात पण रस्त्यांच्या दर्जाबद्दल, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकारने याकडे लक्ष घालावे व एक निश्चित धोरण आहे का ? ते सांगावे असेही बाळासाहेब थोरात यांच्याकडून सरकारला विचारण्यात आले. तसेच नाशिक-मुंबई महामार्गासोबतच बाळासाहेब थोरात यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत देखील प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि प्रशिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाशिक-मुंबई प्रवासासाठी जो वेळ लागत आहे ही बाब खरी असून त्यावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी