34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडे रूग्णालयात दाखल

धनंजय मुंडे रूग्णालयात दाखल

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे ( Dhananjay Munde admitted in Lilawati hospital ).

धनंजय मुंडे यांनी स्वतःहूनच ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता ( Dhananjay Munde admitted in hospital for stomach pain treatment ).

मुंडे यांच्यावर घरीच सुरूवातीला किरकोळ उपचार केले. परंतु त्यानंतर काहीच फरक पडला नाही. त्यामुळे त्यांची इंडोस्कोपी करण्यात आली. मुंडे यांना गेल्या दहा – बारा वर्षांपासून ॲसिडीटीचा सुद्धा त्रास आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मुंडे यांना रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला.

हे सुद्धा वाचा

बिहारमध्ये 3 कोटी मतांची मोजणी शिल्लक,रात्री उशीरा चित्र होणार स्पष्ट

एसटीसाठी ठाकरे सरकारकडून एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर

Bihar election : बिहार निवडणुकीत कोण बाजी मारणार? नितीशकुमार की तेजस्वी? आज निकाल

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे आज सकाळी लिलावती रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यांच्या आजारापणाचे ‘इन्व्हेस्टिगेशन’ करण्यात येणार आहे. आजाराचे निधान झाल्यानंतर उपचाराची दिशा ठरविली जाईल, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, आपली प्रकृती ठीक आहे. उपचार घेऊन लवकरच जनतेच्या सेवेत पुन्हा दाखल होईन, असे मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी