मंत्रालय

मंत्रालयातील दरवाजे नागरिकांसाठी केवळ 1 तासचं खुले!

राज्यात नवे सरकार आल्यापासून मंत्रालयातील गर्दी वाढली आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळापत्रकाचा पर्याय शोधला आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करून कामाच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना आता दुपारी 3 ते 4 या वेळेत मंत्रालयात दरवाजे खुले असतील, असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. मंत्र्यांपासून विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना भेटण्यासाठी ठराविक वेळ आणि दिवस निश्चित करून याबाबतची माहिती कार्यालयाबाहेर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या, तसा शासन निर्णयच (जीआर) सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला आहे.

मंत्रालयात विविध कामे, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना दुपारनंतर प्रवेश मिळतो. शिवाय, विविध स्तरांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळाही ठरवुन देण्यात आलेल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयातील गर्दी वाढली आहे. मंत्र्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या गर्दीमुळे प्रशासकीय कामावर ताण पडत असल्याचीही कुजबूज आहे. त्यामुळे या गर्दीला आवरण्यासाठी निश्चित वेळापत्रकानुसार भेटी देण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे मंत्रालयात पूर्वपरवानगी तसेच परवानगीशिवाय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमावलीचे यापूर्वीचे जीआर अधिक्रमित करून नवा जीआर जारी करण्यात आला आहे.

या जीआरनुसार मंत्र्यांनी लोकांना भेटण्यासाठी आपल्या सोयीने आठवडा, पंधरवडा, महिना यांतील एखादा ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी. त्याबाबतची कल्पना येणाऱ्या द्यावी तसेच भेटीची वेळ दर्शविणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. तर, मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी केवळ 1 तससाठी अर्थात दुपारी 3 ते 4 ही समान वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी. तसेच या वेळेत शक्यतो विभागांतर्गत बैठकांचे आयोजन करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन; अंधेरीतून आरोपीला अटक

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे; कार्यवाहपदी प्रवीण पुरो

‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

क्षेत्रीय पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून ठराविक वेळ राखून ठेवावी. ही वेळ दुपारनंतर ठेवण्यात यावी. या राखीव वेळेत शक्यतो बैठकांचे आयोजन करू नये. तसेच, कामानिमित्त करायचे दौरे किंवा भेटी यासाठी आठवडयातील ठराविक दिवस निश्चित करावेत, तसेच त्याचीही माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. दौरे, भेटींमुळे जर क्षेत्रीय अधिकाऱ्यास कार्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसेल तर अशा प्रसंगी जनतेच्या भेटीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही जीआरमध्ये देण्यात आल्या आहेत.

Team Lay Bhari

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

7 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

9 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago