28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईममंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन; अंधेरीतून आरोपीला अटक

मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन; अंधेरीतून आरोपीला अटक

मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीसमोर सोमवारी (दि.६) रोजी रात्री एका युवकाने हस्तमैथुन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अहमद गौस मोहम्मद रहीनी (वय २३) असे या आरोपीचे नाव असून ताडदेव पोलिसांनी ही कारवाई केली. (Tardeo Police arrested Accused whose masturbating in front of the daughter of government ministry officer)

हा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री रेसकोर्स येथील गवर्नमेंट कॉलनीजवळ घडला. या आरोपीने मुलीला पत्ता विचारण्याच्या बहण्याने गाडीजवळ बोलावले आणि तो हस्तमैथुन करायला लागला. हा किळसवाना प्रकार पाहून मुलीने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला आणि आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर मुलीने ताडदेव पोलिस स्टेशन (Tardeo Police Station) परिसरात धाव घेतली आणि घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.

ताडदेव पोलिसांनी मुलीने काढलेल्या व्हिडीओच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर अंधेरी येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज (दि.९) रोजी आरोपी अहमद गौस मोहम्मद रहिनी याला गिरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा :पोलिसाने केला गर्भवती महिलेचा विनयभंग ; गुन्हे शाखेच्या पोलिसाचे निलंबन

अधिकाऱ्याने घेतली तब्बल ८.५ लाखाची लाच…

राखी सावंतला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण

मुंबईत महिला अत्याचार आणि सुरक्षेच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिलांची छेडछाड काढणे, त्यांच्यासमोर अश्लील हावभाव करणे, महिलांवर अत्याचार करणे अशा अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक संतापजनक घटना आज अंधेरीतून समोर आली. मुंबईत महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र अशा निर्भया पथकाची स्थापना देखील मुंबई पोलिस दलात करण्यात आली आहे. मात्र महिला सुरक्षा, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून देखील समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी