29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले'

‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करुन हिंदुत्त्वाशी गद्दारी केली आहे. त्यांनी हिंदुत्त्व शब्द ओठावर आणू नये, सावरकरांची माफीमागून आता चालणार नाही, अशी घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करुन हिंदुत्त्वाशी गद्दारी केली आहे. त्यांनी हिंदुत्त्व शब्द ओठावर आणू नये, सावरकरांची माफीमागून आता चालणार नाही, अशी घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ” राज ठाकरे म्हणाले होते उद्धव ठाकरे पाच सहा वेळाच मंत्रालयात गेले, मात्र माझ्या माहितीनुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे केवळ दोन अडीच तासच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसले होते, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, आता ते उद्योगांवर बोलत असतात. मात्र ते सत्तेत असतानाच्या अडीच वर्षांच्या काळात किती उद्योग गेले यावर मात्र ठाकरे बोलत नाहीत. मी चार वर्षे राज्यात उद्योगमंत्री होतो. मला माहिती आहे, मोठमोठ्या उद्योगांचे प्रस्ताव कसे येतात, राज्य सरकार कसे प्रस्ताव घेते. मात्र उद्धवजींना सरकारचे नियम, कायदे, परंपरा याबद्दल काहीच माहिती नाही, अशी टीका राणे यांनी केली.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना केवळ खुर्चीवर बसणे येवढेच माहिती आहे, ते पण मंत्रालयातील खुर्चीवर बसायचे नव्हे तर दुसऱ्याच खुर्चीवर अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. या सरकारच्या काळात मोठे उद्योग गेल्याचे म्हणतात, मात्र जे उद्योग राज्याबाहेर गेले त्या कंपन्यांशी सत्तेत असतांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बोलत होते. मग का गेले उद्योग राज्याबाहेर?, कोण बोलत होते कंपन्यांशी?, याबद्द्ल कोण सांगणार? असे सवाल करतांनाच राणे यांनी राज्याबाहेर जे उद्योग गेले ते तुमच्या काळात गेले. मात्र आता आमचे सरकार असताना तुम्ही आम्हाला उद्योग राज्याबाहेर गेले असे का बोलता, असा सवाल देखील केला.
हे सुद्धा वाचा
पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
Video : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी !
ऋतुराजने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात धरली होती, 7 षटकारांनंतर आई-वडिलांचे कौतुकोद्गार

यावेळी राणे यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख करत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये किती गुंतवणूक झाली याची आकडेवारीच वाचून दाखविली. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक 62 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे दे्खील त्यांनी त्या बातमीचा हवाला देत सांगितले. उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय व्यवस्थेची एबीसीडी देखील माहिती नाही, अशी बोचरी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तुम्हाला कौतुक करता येत नसेल तर राहू द्या मात्र टीका करायची असेल तर पुराव्यांसह टीका करुन दाखवा असे आव्हान देखील यावेळी दिले. लोकांमध्ये विनाकारण सरकारबद्दल भ्रम निर्मान करायचे काम ठाकरे करत आहेत. आपण काही करु शकलो नाही, आपल्या माथ्याला अपयशाचा लागलेला कलंक दुसऱ्याच्या माथी मारू नका असे देखील नारायण राणे यावेळी उद्धव ठाकरे यांना म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी