मंत्रालय

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे – पाटलांच्या संभाव्य महसुल खात्यात गाववाले सचिव !

एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारच्या मुहूर्तावर पार पडला. मंत्रीपदाच्या शपथविधीमध्ये प्रोटोकॉलनुसार पहिले स्थान राधाकृष्ण विखे – पाटील यांना मिळाले. सर्व १८ मंत्र्यांना मंत्रीपदे मिळाली. पण सगळ्यांनाच अद्याप खाती मिळालेली नाहीत. असे असले तरी कोणाला कोणते खाते मिळणार ? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे – पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना महसूल खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. विखे – पाटील यांना महसूल खाते मिळाल्यास त्यांना एक सवंगडी मिळणार आहे. महसूल खात्यात अगोदरच कार्यरत असलेले अपर मुख्य सचिव नितीन करीर हे लोणी (अहमदनगर) या गावचे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा लोणीचेच आहेत. त्यामुळे महसूल खात्याचे दोन्ही प्रमुख एकाच गावचे असा योग जुळून येणार आहे. हा योग जुळून यावा, अशी असंख्य नगरकरांची सुद्धा इच्छा असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’ला सांगितले.

विखे – पाटील कुटुंबाने लोणी परिसरात सहकार व शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. विखे – पाटलांच्या या कार्यकर्तृत्वामुळे लोणी परिसर अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशातही ओळखला जातो. राधाकृष्ण विखे – पाटील हे महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध खात्यांची जबाबदारी पार पाडताना आपल्या कामाची छाप उमटवली होती.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या ‘ठळक’ बाबी !

Eknath Shinde Cabinet : नव्या मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे लॉबिंग

Eknath Shinde Cabinet Expansion : दीपक केसरकरांना मंत्रीपद, निलेश राणेंची मात्र फजिती !

कृषी, शिक्षण, परिवहन, विधी व न्याय, पणन या खात्यांतील त्यांचे काम प्रभावी होते. कृषी मंत्री असताना ठिबक सिंचन व साखळी सिमेंट बंधारे या दोन योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या होत्या. ठिबक सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.

शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांनी त्यावेळी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली होती. आता या प्रणालीचा राज्यभरातील लाखो विद्यार्थी फायदा घेत आहेत. पण त्याची सुरूवात विखे – पाटील यांनी केली होती. आयसीएसई, सीबीएसई व एसएससी बोर्डातील गुणांमध्ये समानता आणण्याचे किचकट प्रकरण सोडविण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट उपसले होते. साखळी सिमेंट बंधारे योजनेमुळे दुष्काळी भागाला मोठा फायदा झाला होता. गृहनिर्माण खात्यात सुद्धा त्यांनी अल्पकाळ काम केले होते. या अल्पकाळात सुद्धा त्यांनी सामान्य लोकांना कमी दरांत घरे मिळवून देणाऱ्या योजना राबविल्या होत्या.

विविध खात्यांचा दांडगा अनुभव असलेले विखे – पाटील यांच्याकडे आता महसूल खात्याची धुरा येईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महसूल खाते हे सरकारमधील बलदंड खाते म्हणून ओखळले जाते. मंत्रालयापासून ते गाव पातळीपर्यंत या खात्याची वचक असते. महसूल खात्याचे अन्य सर्व खात्यावर सुद्धा नियंत्रण असते. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा यशस्वी होवून सेवेत आलेले बहुतांश अधिकारी या खात्यात काम करीत असतात. त्यामुळे या खात्याला विशेष महत्व आहे.

सध्या महसूल खात्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव नितीन करीर कार्यरत आहेत. नितीन करीर हे प्रचंड हुशार, तल्लख बुद्धीचे, जनहिताचे निर्णय घेणारे, वेगवान व प्रभावी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विखे – पाटील व करीर या दोघांचा महसूल विभागात योग जुळून आला तर लोणीचे हे दोन्ही सवंगडी महाराष्ट्र हिताचे मोठाले निर्णय घेतील, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago