31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईMNS Effect : मनसेच्या मागणीला अ‍ॅमेझॉनचा प्रतिसाद, मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करणार

MNS Effect : मनसेच्या मागणीला अ‍ॅमेझॉनचा प्रतिसाद, मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करणार

टीम लय भारी

मुंबई : नवरात्रीच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतात. पण, या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. मात्र आता मनसेच्या या भूमिकेची अ‍ॅमेझॉनने दखल घेतली आहे. (MNS Effect: Amazon responds to MNS demand, launches app in Marathi)

अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने ‘अ‍ॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल’ असं अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ‘अ‍ॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं’ असं ट्विट अखिल यांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी