मुंबई

भुजबळांचे मुंबईत पुनर्वसन !

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राजकीय उदय शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईत झाला होता. शिवसेनेकडून मुंबईचे महापौर, आमदार अशी त्यांची कारकिर्द घडत गेली. मात्र शिवसेना सोडल्यानंतर त्यांना मुंबई देखील सोडावी लागली. नाशिकच्या येवला मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून येऊ लागले. आता छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांचा हात पकडला आहे, अजित पवार यांच्याकडून पक्षबांधणी सुरु आहे, बुधवारी (दि.27) रोजी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे भुजबळ कुटुंबाचे पुन्हा मुंबईत राजकीय पुनर्वसन झाल्याची चर्चा आहे.

मंडल आयोगाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकत शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही काळानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ देखील राष्ट्रवादीत आले. एका भाषणात भुजबळ यांनीच राष्ट्रवादी पक्ष स्थापनेची आठवण सांगताना माझ्या घरातच पक्ष स्थापनेची बैठक झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी अनेक मंत्रीपदे सांभाळली. मात्र शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेचा कडवा विरोध त्यांना पत्करावा लागला. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत भुजबळांचा पराभव केला होता. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ म्हणून येवला मतदारसंघातून भुजबळांनी आपली पुढील राजकीय वाटचाल सुरु ठेवली. त्यानंतर मुंबईचा त्यांचा संपर्क तुटला.

जुलै महिन्यात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यांच्यासोबत भुजबळ यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी अजित पवार सध्या व्यस्त आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी, पक्षप्रवेश होत आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार असल्याचे मानले जाते. मुंबईत अजित पवार गटाकडून पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईची राजकीय जाण असाणारे नेतृत्व अजित पवार यांना हवे होते. त्या दृष्टीने अजित पवार यांना भुजबळ यांची साथ मिळाली आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ य़ांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाली असून भुजबळांचे पुन्हा मुंबईत पुनर्वसन झाल्याचे मानले जात आहे.

आज मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. त्यांना मुंबई शहरातील देखील बारकावे माहिती आहेत. गेल्या २५ वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेलं, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. ते मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समीर भुजबळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मुंबई शहराकडे आजवर पक्षाकडून दुर्लक्ष झालं आगामी काळात मुंबईचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाशिक प्रमाणे मुंबई शहराचा समीर भुजबळ यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्या काम करण्याची क्षमता असल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. नाशिक प्रमाणे मुंबईला देखील काम करावं असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई शहराला सचिन अहिर आणि त्या नंतर नवाब मलिक यांनी अतिशय चांगल काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेच्या कार्यकाळात समीर भुजबळ यांनी पक्षाचे चिन्ह, झेंडा नोंदणी, बैठका, सभा यासह महत्वाची कामे त्यांनी पार पाडली आहे. पक्षाने समीर भुजबळ यांची मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते पक्षवाढीसाठी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडतील त्यांना आपल्याला सर्वांना अधिक बळ द्यावं लागेल असे त्यांनी सांगितले. समीर भुजबळ यांच्या नेतत्वाखाली मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा मानाचं पान तयार केल्याशिवाय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा 
शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला
इर्शाळवाडीतील अनाथ बालकांना एकनाथ शिंदेंनी भरविले मोदक !
अजित पवारांनी साधला ‘मोका’ !

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतातील कार्यकारिणी निर्माण करण्यात येऊन त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाच्या वाढीस अधिक फायदा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना समीर भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून आपण पक्षात कार्यरत असून अनेक महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई हे राज्यातील महत्वाचं शहर आहे. या शहरातच माझी जडघडण झाली आहे. त्यामुळे या शहराच्या प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपण ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक बळकट करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदीप माळी

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

6 hours ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

6 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

7 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

8 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

8 hours ago