29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला

शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखे पहायला मिळावे हे भारतीयांचे स्वप्न होते. पण ते आता सत्यात उतरणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना फळ आले असून १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे मुंबईत येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार व वाघनखे ग्रेट ब्रिटनमधील संग्रहालयांमधून भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न शासनाद्वारे केले जात आहेत. त्यासाठी तलवार व वाघनखे संग्रहित असलेल्या संग्रहालयांना भेट देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य व संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय या चार सदस्यांचे शिष्टमंडळ दि. २९ सप्टेंबर  ते  ४ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत ग्रेट ब्रिटन येथे दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीमध्ये दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर उभय देशांद्वारे स्वाक्षरी होऊन करारास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

स्वराज्य म्हणजेच रयतेच राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्रासाठी वंदनीय आहे. स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक स्वतंत्र युध्द निती वापरली. या युध्दनितीमध्ये वापरली जाणारी शस्त्रे ही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे अभ्यासाअंती लक्षात येते. त्यापैकीच एक असलेले शस्त्र म्हणजे वाघनखे होय. शिवाजी महाराजांनी याच वाघ नखांचा वापर करून अफजल खानचा वध केला होता.

ही वाघनखे सद्यस्थितीत महाराष्ट्रात नसून ग्रेट ब्रिटन येथील संग्रहालयामध्ये आहे. त्यामुळे ती सर्वसामान्य जनतेच बघणे दुरापास्त होते. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार मंत्री यांच्या वाघनखे भारतात आणण्याच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. ही वाघनखे पुढील काळात पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अंतर्गत असणाऱ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. स्वराज्याच्या कामी आलेल्या या वाघनखाच्या व मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. या शिवशस्त्रगाथेपासून स्फुर्ती घेऊन देशप्रेमाची भावना वाढीस लागेल असे आचरण करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रिटिश राजवटीत भारतीयांच्या स्वराज्याची कल्पना परकीय शक्तींविरुद्ध लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होती. या कल्पनेने ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यालाही चालना दिली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशवासीयांना राष्ट्रवादाच्या भावनेसाठी प्रेरित करणारे आदर्श मानले जातात. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनतेसाठी वंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित तलवार व बाघनखे ही इंग्रजांनी भारतातुर इंग्लडला नेली. त्यासंबंधी केलेल्या ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की सध्या ही तलवार सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शनचा भाग आहे आणि बागनख (वाघाचे पंजे) इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या संग्रहाचा भाग आहेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय कायदे किंवा करार केवळ चोरीच्या किवा अवैध तस्करीद्वारे निर्यात केलेल्या वस्तूंना लागू आहेत. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंडला नेण्यात आलेल्या पुरातन वास्तू परत करण्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात कोणताही करार झालेला नाही त्यामुळे या वस्तूंचे प्रत्यार्पण करणे शक्य नाही.

ऐतिहासिक महत्व

सोळाव्या शतकात प्रस्थापित राजकीय व्यवस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पाने शह दिला. शिवरायांच्या काळात महाराष्ट्रापासून सुरु झालेले स्वराज्य छत्रपती शाहूंच्या काळात अटकेपावेतो जाऊन भिडले. या संघर्षत प्रत्येक युद्धागणिक भारताच्या राजकीय पटलावर आणि पर्यायाने युद्धपटलावर मराठा शस्त्रे हा स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. कमी उंची, आकारातला सरळपणा (पाती किंवा शस्त्राचा एकूण आकार फारसा वक्र नसणे), शस्त्रांचे ओतीव / अखंड स्वरूप (जोड़ न देता बनवलेली शस्त्रे ) अत्यंत मोजके किंवा कमी नक्षीकाम, शस्त्र निर्माणकर्त्यांच्या चिन्हांची अथवा शिक्क्यांची सहसा अनुपलब्धता, शस्त्रांवर तारखांचा अभाव या वैशिष्ट्यांमुळे मराठा शस्त्रे अन्य भारतीय शस्त्रांहून वेगळी ठरली. मराठा शस्त्रांची वैशिष्ट्ये आणि इतिहास आजपर्यंत अभ्यासक आणि सामान्य माणसांपर्यंत मांडला गेलेला नाही. या प्रदर्शनांच्या माध्यमातून ती संधी निश्चितच मिळू शकते.

१८१८ पासून ग्रैंड डफ यांची नेमणूक साताराच्या संस्थानाचा रेसिडेंट म्हणून झाली. इ.स. १८१९ पासुन इ. स. १८२२ पर्यंत तो साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांचे नावे कारभार पाहत होता. त्यांनी ही वाघनखे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचेकडुन मिळविली व इंग्लड ला नेली. अँड डफचा नातू किंवा पणतू अॅड्रिन डफ याने ती वाघनखे व्हिक्टोरीया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमला दिली. त्या संग्रहालयात या वाचनाखांचे “Tiger Claws, said to have been possessed by Shivaji” अशी नोंद आहे. ही वाघनखे या म्युझीयमच्या तळघरातील एका कपाटात ठेवली आहेत. त्यासाठी एक खास पेटी आहे. ती बघण्यासाठी परवानगीची आवश्यक आहे. ती उत्कृष्ट पोलादापासून बनविलेली असून अतिशय प्रमाणबध्द आहे.

एक पट्टी, त्यावर खालच्या बाजूस बसविलेलया चार नख्या आणि वरच्या बाजूस अंगठ्या असे या वाघनखांचे स्वरुप आहे. ही वाघनखे डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत तर मोठी अंगठी तर्जनीच्या बोटात जाते. मग चार नखे चार बोटांच्या बरोबर खाली येतात. अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रतापी गुप्त शस्त्र आहे.

हे सुद्धा वाचा
इर्शाळवाडीतील अनाथ बालकांना एकनाथ शिंदेंनी भरविले मोदक !

मुख्यमंत्र्यांनी दाखवली ३० देशांच्या नामवंतांना भारतीय संस्कृती
बावनकुळेंच्या ‘धाब्या’वरून ट्विटरवर ‘काव्य’युद्ध, सुप्रिया सुळे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटरवर खडाजंगी

महाराष्ट्र शासनाची भूमिका

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भातरभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार व वाघनखे भारतात आणण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनातर्फे केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित पुरातन वास्तू आणि इंग्रज राज्यकत्यांनी इंग्लंडला नेलेल्या वाघनख (वाघांचे पंजे परत आणण्याची महाराष्ट्रातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

विधानसमेत प्रश्नोत्तराच्या तासात हा चर्चेचा विषय होता आणि महाराष्ट्राच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभागृहातील माननीय सदस्यांनी या वस्तू मायदेशात परत आणण्याबाबत एकमताने भावना व्यक्त केल्या. ब्रिटीश राजवटीत पुरातन वास्तू आणि कला वस्तूंची वाहतूक आपल्या देशाच्या कलेच्या खजिन्यासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेसाठी घातक ठरली आहे.
या जनभावना लक्षात घेता सुधीर मुनगंटीवार यांनी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त इंग्लंडमध्ये असलेली वाघनखे परत आणण्याचा संकल्प जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे भारतात परत आणण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला आहे.

या विषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी संबंधित उभय देशांमधील प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करुन चर्चा केली आहे. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी दि. १५. एप्रिल २०२३ रोजी ओबेरॉय हॉटेल येथे अॅलेन गॅमेल, उप उच्चायुक्त, पश्चिम भारत इमोगेन स्टोन, मा. उपप्रमुख, राजकीय व द्विपक्षिय व्यवहार यांच्या समवेत वाघनखे भारतात परत आणण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करुन चर्चा केली होती. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अंड अल्बर्ट म्युझियम लंडन इंग्लंड यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी ही वाघनखे तीन वर्षाच्या मुदतीने कर्ज म्हणून प्रदर्शनासाठी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी