34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeमुंबईArjun Rampal : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले...

Arjun Rampal : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले समन्स

टीम लय भारी

मुंबई : एनसीबीने याआधी अर्जुन (Arjun Rampal) आणि गॅब्रीएला यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. असा दावा एनसीबीने केला होता. त्याआधी एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. एनसीबी अधिकाऱ्याने यासंदर्भातली माहिती ‘एएनआय’शी बोलताना दिली.

तसंच, अर्जुन रामपाल याची देखील एनसीबीने दोनदा चौकशी केली आहे. त्यानंतर अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनने दावा केला आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे आणि कुत्र्याची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनने म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते, त्याला एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्स तपासासाठी पाठविली होती. अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुमारे सहा तास चालली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा ड्रग्ज घेणारा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी