मुंबई

Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’

महाराष्ट्राच्या राजकारणातले वाद आता विकोपाला गेले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांत तर राज्याच्या राजकारणाने आरोप प्रत्यारोपांची परिसीमा गाठली आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेले भाजप शिवसेनेने आता एकमेकांची कॉलर पकडली आहे. शिवसेना नेमकी कुणाची हा वाद दोन‍ महिन्यांपासून न्यायालयात प्रलिं‍ब‍ित आहे. या वादाचा निकाल लागण्यापूर्वी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घ्यायचा यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे जुन्यावादासह नवा वाद घेऊन शिवसेना आणि भाजप आमने सामने ठाकले आहेत. त्यावरुन शाब्दीक चकमकी उडत आहेत. या वादामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष अश‍िष शेलार रणांगणात उतरले असून, ते मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेला उत्तर देत आहेत.

तर शिवसेनचे मुख पत्र असलेल्या सामना मधून उद्धव ठाकरे टोकदार शब्दात भाजपवर टीका करत आहेत. नुकताच त्यांनी भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता. त्यानंतर अश‍िष शेलार यांनी भाजपला कमळाबाई असे न हिणवण्याची तंबीच दिली आहे. तुम्ही आम्हाला कमळाबाई म्हणालात तर आम्ही तुम्हाला पेंग्विनसेना म्हणून असा इशाराच दिला आहे. शिवसेनेकडून आता ठाकरे प‍िता पुत्र रणांगणात उतरले आहेत. तर भाजपचे बडे नेते त्यांच्या टीकेला उत्तर देत आहेत. एका पत्रकातून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. आशिष शेलार म्हणतात की, फोडा-झोडा सोडा तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा ! दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता….. पालिकेच्या मराठी शाळा बुद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ. अमरापूरकर यांचा बळी कोणी घेतला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात मराठी माणसावर गोळया झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले? फोडा झोडा सोडा, तुमचे मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरू आहे, त्याचे काय? मराठी माणसात फूट, ही आरोळी 100 टक्क झुट! महापालिकेत अमराठी कंत्राटदार, ब‍िल्डर यांनीच पोसले. तीन लाख कोटींचे कमीशन कोणी खाल्ले. गिरणी कामगारांना उद्धवस्त कोणी केले. मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आण‍ि वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे….आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार कि आण‍खी त्याच्यापण पुढे? हे म‍िशन नव्हे कमिशन कर्तबार नेते सोडून गेले. बंधूराजांनी वेगळी चूल मांडली….खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले… वाम मार्गाने मिळवलेले पद गमवावे लागले.

हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले… तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरूच…स्वत:चे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भव्याला का बदनाम करताय नाचता येईना अंगण वाकडे! स्वत:चे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे !‍ आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आशा प्रकारे शिवसेनेवर घाणाघाती टीका केली आहे.

कारण मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेची 25 वर्षे सत्ता आहे. पालिकेचा भोंगळ कारभार वेळोवेळी उघड होत आहे. पालिकेतला भ्रष्टाचार उघड होत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागली असून, त्या शाळा बदं पडल्या आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे मुंबई जलमय झाली. त्यामध्ये डॉ. अमरापुरकर हे गटारवजा नाल्यातून वाहून गेले होते. त्यावेळी विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर होते. उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये मराठी माणसांचे कैवारी वाटतात. त्याच शिवसेनेची 25 वर्षे सत्ता असलेल्या पालिकेमध्ये अमराठी कंत्राटदार, बिल्डर आहेत. मुंबईत गिरणीकामगारांचा लढा झाला.

हे सुद्धा वाचा

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

Parth Pawar : पार्थ पवार पडले घराबाहेर…

VIDEO : शेतकऱ्यांचे जीवन दाखवणारा गणपती देखावा !

दत्ता सामंत हे या लढयाचे पुढारी होते. त्यानंतर मुंबईमधील गिरणी बंद पडल्या. मराठी माणूस बेरोजगार झाला. मुंबईचा विस्तार होत आहे. शिवसेना वाढवण्यात ज्यांचे योगदान होते, ते छगन भुजबळ, नारायण राणे शिवसेना सोडून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली आणि आता एकनाथ शिंदेंनी मोठे बंड केले. त्यांच्या सोबत अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते, सोडून गेले. या बंडखोरीचे खापर उद्धव ठाकरे हे भाजपवर फोडत आहेत. आशा प्रकारे भाजप आणि‍ शिवसेनेचे वाद विकोपाला गेले आहेत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

3 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

3 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

4 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

4 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

5 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

5 hours ago