28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रPankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले

सणासुदीच्या दिवशी सगळ्याच गोष्टी सुरळीत, व्यवस्थित व्हायला हव्यात असा प्रत्येकाचाच मानस असतो, त्यासाठी प्रत्येकचजण प्रयत्नशील असतो परंतु अशावेळी एखादी गोष्ट जरी बिनसली तरी निराशा होते, असेच काहीसे परळी शहरवासीयांचे झाले.

राज्यात सध्या सगळीकडे गणोशोत्सवाची धामधुम पाहायला मिळत आहे. भक्तीमय आणि उत्साहपुर्ण वातावरणात सगळेच अगदी न्हाऊन निघत आहेत. एकीकडे असे चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र ऐन सणासुदीच्या वेळी वीजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बीड जिल्ह्यात रात्री अचानक वीज गायब झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सणाच्या वेळी वीजेच्या खोळंब्यामुळे नागरिक संताप व्यक्त करू लागले, याची दखल घेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. पंकजा मुंडे यांनी दरडावताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेत वीज पुरवठा सुरू केला.

बीड जिल्ह्यातील परळी शहरात रात्री अचानक वीज पुरवठा विस्कळीत झाला. सध्या राज्यात गणेशोत्सव आणि महालक्ष्मीचा सण असल्याने अगदी सगळ्याच घराघरांत जल्लोषाचे वातावरण आहे. परळीत सुद्धा महालक्ष्मीची आरास, सजावट , देखावा, गणेशाची पूजा आरती असं सगळं काही सुरू असताना अचानक वीज  खंडीत झाली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अचानक वीज गेल्याने अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा सगळा प्रकार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कानावर गेला. त्यावेळी त्यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेत वीज कर्मचाऱ्यांना सुनावले आहे.

 हे सुद्धा वाचा…

Ganeshotsav 2022: बुडण्यापासून वाचा – बाप्पाचे विसर्जन स्वयंसेवकांच्या मदतीने करा

Parth Pawar : पार्थ पवार पडले घराबाहेर…

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना मातृशोक

ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत कर्मचाऱ्यांची मुंडे यांनी कानउघडणी केली, त्यामुळे तात्काळ वीज कर्मचाऱ्यांनी सुद्धा दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि वीज पुरवठा सुरळीत केला. रात्रभर परळी अंधारात राहिली, दुसऱ्या दिवशी 12.30 नंंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान वीजेच्या लपंडावापासून सूटका केल्याबद्दल लोकांनी पंकजा मुंडे यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

सणासुदीच्या दिवशी सगळ्याच गोष्टी सुरळीत, व्यवस्थित व्हायला हव्यात असा प्रत्येकाचाच मानस असतो, त्यासाठी प्रत्येकचजण प्रयत्नशील असतो परंतु अशावेळी एखादी गोष्ट जरी बिनसली तरी निराशा होते, असेच काहीसे परळी शहरवासीयांचे झाले. सणाच्या वेळीच वीज गायब झाल्याने सगळ्याच गोष्टींचा खेळखंडोबा झाला, त्यामुळे लोकांकडून यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी