33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयParth Pawar : पार्थ पवार पडले घराबाहेर...

Parth Pawar : पार्थ पवार पडले घराबाहेर…

पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविली. पण त्यांचा पराभव झाला. पवार घराण्यासाठी हा मोठा धक्का होता. पराभव झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मतदारसंघात लक्ष घालणे अपेक्षित होते. पण त्यांनी लक्ष घातलेच नाही.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) कधी नव्हे ते आज सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईतील विविध गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. लालबागचा राजा, गणेश गल्ली, नरे पार्क अशा ठिकाणच्या गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. गणपती बाप्पांचे त्यांनी यावेळी दर्शन घेतले. सन २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे काही ट्विट केले होते. या ट्विटवरून शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारले होते. लोकसभेतील पराभव, अन् शरद पवारांनी केलेली टिप्पणी यामुळे पार्थ पवार जनतेच्या नजरेत आले होते.

सन २०१९ मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार होते. परंतु पार्थ पवार यांनी सुद्धा मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. एकाच कुटुंबातील कितीजणांनी निवडणूक लढवायची असा सवाल उपस्थित करीत शरद पवार यांनी त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय रद्द केला होता.

पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविली. पण त्यांचा पराभव झाला. पवार घराण्यासाठी हा मोठा धक्का होता. पराभव झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मतदारसंघात लक्ष घालणे अपेक्षित होते. पण त्यांनी लक्ष घातलेच नाही.

पार्थ पवार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. पण अशा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याची काळजी सुद्धा पार्थ पवार घेत नाहीत. मतदारसंघात पक्षाने ठरविलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, संघटन वाढविणे अशा बाबींकडे पार्थ पवार यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मरगळ आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

Parth Pawar : पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Politics : पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने : चंद्रकांत पाटील

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अगोदर अजित पवारांना फटकारले, आता पार्थला; म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे

आपल्या राजकीय करिअरविषयी फार गंभीर नसलेले पार्थ पवार अचानक गणपती दर्शनाच्या निमित्ताने दिसल्याने लोकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पार्थ पवार जसे बाहेर आले, तसेच त्यांनी स्वतःचे दर्शन देण्यासाठी आपल्या मतदारांकडेही नियमितपणे जायला हवे, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

रोहित पवार यांचा आदर्श घ्यावा

पार्थ पवार आणि रोहित पवार या दोन्ही चुलत बंधूंमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. रोहित पवार यांनी कर्जत – जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याअगोदर या मतदारसंघाची अचूक बांधणी केली होती.

रोहित पवार सतत जनतेमध्ये असतात. मतदारसंघातील प्रश्न बारकाईने समजून घेतात. मतदारांची कामे करतात. सरकार दरबारी पाठपुरावा करून जनतेची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करतात. जनतेसाठी नाविन्यपूर्व उपक्रम राबवितात. रोहित पवार यांच्याकडे असलेले कोणतेच गुण पार्थ पवार यांच्यात दिसत नाहीत. किंबहूना स्वतःला बळकट करण्याकडेही पार्थ पवार लक्ष देत नाहीत.

‘लय भारी’चा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी