मुंबई

Dasara Melava : शिंदेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जिथे पाहावं तिथे एकच चर्चा सुरू आहे. ती चर्चा अर्थातच यंदाच्या दसरा मेळाव्याची आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच शिवसेनेची ओळख असणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची गर्दी दोन भागांत विभागली जाणार आहे. एकीकडे शिवाजी पार्क मैदानावर प्रथेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्दधव ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे बांद्रा येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करणार असल्याची माहिती उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून. त्याला “‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…” असे कॅप्शन देण्यात आले आहे.

सध्या शिवसेनेच्या हक्कावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. अशातंच आता शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमुळे वातावरण आणखी तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीच शिंदे गटातर्फेदेखील दसरा मेळाव्याचा एक टीझर शेअर करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी “आम्ही विचारांचे वारसदार”, म्हणत “एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ” अशा वाक्यानिशी शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

Repo Rate बापरे ! एका वर्षात चार वेळा वाढले रेपो रेट

Mumbai News : प्रसिद्ध अभिनेतेच्या मुलाला देवाज्ञा! सिनेसृष्टीत शोककळा

दुसरीकडे शिवसेनेन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये “एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार असे सांगत उद्धव ठाकरेंच्या वक्तृत्व शैलीची झलक देखील दाखवण्यात आली आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गटाकडून गर्दीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी राज्यासह देशभरात दसऱ्याचा सण साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सोनं लुटटून हा सण साजरा केला जातो तर अनेक ठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करून उत्साहात जल्लोष साजरा केला जातो. अशा परिस्थितीत मुंबईतील दोन्हीू धिकाणी विचारांचे सोनं लुटण्याची पुरेपुर सोय शिवसैनिकांसाठी करण्यात आली आहे. आता या दसरा मेळाव्याच्या संधीचे खऱ्या अर्थाने सोनं करून लोकांच्या मनातील द्वेशाचे दहन करून कोणता नेता शिवसैनिकांच्या मनात आपली हक्काची जागा मिळवणार हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago