मुंबई

डॉ. तात्याराव लाहने, डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा सरकारकडून तातडीने मंजूर

मार्डच्या निवडी डॉक्टर मंडळींनी डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर विरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या प्रकरणी लहानेसह ९ डॉक्टर मंडळींनी राजीनामा दिला होता. तो सरकारने तातडीने मंजूर केला असून नवीन नियुक्तीचे आदेशही दिले आहेत. डॉ. लहाने यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.

जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांनी ९ डॉक्टरांसमवेत राजीनामा दिला होता. तो आता स्वीकारण्यात आला आहे. मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानेही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे म्हणाल्या, अमित शाह यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करणार

पावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही… मग हे वाचाच

ओडिसा रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट  

निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर डॉ. लहाने यांनी राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या बदलीची मागणी देखील करण्यात आली होती. यानंतर पत्रकार मंडळीशी बोलताना लहाने म्हणाले की. मी ३१ मे रोजा राजीनामा दिला होता. कारण आमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यावर आमचं मत न घेता अहवाल सादर करण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनी खोटे आरोप केल्यानंतर व्यथीत होऊन आठ जणांनी राजीनामा आणि एक जणांने व्हीआरएस दिली होती. त्यानंतर आम्ही राजीनामा स्वीकारण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यामुळे आता राजीनामा मंजूर केल्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो, असे तात्याराव लहाने म्हणाले.

 

विवेक कांबळे

Recent Posts

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

48 mins ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

2 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

4 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

4 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

4 hours ago

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…

5 hours ago