30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयओडिसा रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट

ओडिसा रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट

ओडिसातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत जवळपास 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातांच्या इतिहासातील मोठ्या अपघातांपैकी हा ही दुर्घटना देखील अतिशय मोठी दुर्घटना आहे. रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंतप्रधान रुग्णालयात भेट देऊन जखमींशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधानांनी दौऱ्याआधी आढावा बैठक घेतली.

पंतप्रधानांनी आज मोदींनी ओडीसात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची माहिती घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली. या बेठकीत त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. मोदी घटनास्थळाचा दौरा आटोपल्यानंतर कटक येथील रुग्णालयात जावून जखमींशी संवाद साधणार आहेत.

ओडिसातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बंगळुरु-हावडा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने एका मालगाडीवर आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात मृतांची संख्या वाढून शनिवारी 261 पर्यंत पोहचली असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा
Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य…

मुंबईकरांनो उद्या बाहेर पडणार असणार तर सावधान! ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी…महिन्याचा 79,000 इतका पगार

या रेल्वे अपघातानंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफसह सर्वसामान्य लोक देखील मदतकार्यासाठी धावून आले. अपघातातील प्रवाशांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात देखील जखमींच्या मदतकार्यासाठी लोक पुढाकार घेत आहेत. कटक येथील एससीबी मेडिकल कॉजेल के डॉक्टरांनी सांगितले की, शुक्रवारी अपघात झाल्यानंतर कटक, बालासोर आणि भद्रकमधून 3000 युनिट रक्त जमा झाले आहे. तसेच पीएम आणि सीएम रिलीफ फडांत देखील रक्त युनिट जमा केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी