29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे म्हणाल्या, अमित शाह यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करणार

पंकजा मुंडे म्हणाल्या, अमित शाह यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करणार

गेल्या काही काळापासून पंकजा मुडे भाजपमध्ये नाराज आहेत, अशी चर्चा माध्यमांमध्ये होत आहे. पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण होत आहे, पंकजा मुडे पक्षांतर करणार अशा चर्चा वारंवार होत असतात. मात्र आज स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पंकजामुंडे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतानाच. मी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, गेली 19 वर्षे मी राजकारण करत आहे, 2014 साली मला मुंडे साहेबांनी प्रचारात उभे केले तेव्हा मुंडे साहेबांनी मला सांगितले. स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा पाहिजे, आणि तु माझा प्रचार कर आणि 2014 ला मी मुंडे साहेबांचा प्रचार केला. तेव्हा पासून 2023 पर्यंत मी सार्वजनिक जीवनात आहे. गेल्या पाच वर्षात जे अनुभव आले ते फार अनोखे आले. आज मी माझ्या पित्याच्या जाण्यानंततर पुण्यस्मनामध्ये थोडीशी मनात पीडा ठेवून, त्यांच्या आठवणी दाबून, अश्रु दाबून आलेल्या सगळ्या येत्यांचे आभार मानते. हे लोक येथे उपस्थिती लावतात म्हणून या कार्यक्रमाची गरिमा आहे, समोरच्या भक्तांची उपस्थिती आहे, म्हणून या कार्यक्रमाची गरिमा आहे. हे मनात सगळ साठवून ठेवून मी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनामध्ये जर सतत शंका वाटली की माझ्या बोलण्याचे काय अर्थ निघतील तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण करु शकणार नाही. ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला आवडणार नाही असे मी बोलणार नाही, त्या दिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभे राहण्याचा अधिकार नाही.

पंकजा मुंडे म्हणाल्या मीडिया फार माझ्या मागे आहे, त्यांचे ही माझ्यावर उपकार आहेत, त्यांचे ही मी आभार मानते, माझं म्हणणं त्यांनी पोहचवलं कोणत्याही अर्थाने पोहचवलं तरी माझ्या माणसापर्यंत ते बरोबरच पोहचतं. त्यामुळे ते माझ माध्यम आहे, त्यांना आज वाटतयं ताई काय बोलणार आहेत. माझ्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये याच ठिकाणी डाव्या बाजूला मी अनेकवेळा हजार वेळा माझी भूमिका मांडली आहे, ती परत परत मांडावे एवढे लेचीपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत, जसे रामाने बाण सोडल्यानंतर तो परत येत नसतो. तसा माणसाच्या तोंडात शब्द असावा, शब्द गोल फिरवायची वेळ येऊ नये. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे, त्यामध्ये विसावले आहेत माझे पिता गोपीनाथ मुंडे. आयुष्याात कधीच सत्तेचे स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षात राजकारणात सुरुवात केली आणि सत्तेच्या उच्च शिखरापर्यंत पक्षाला पोहचविण्यापर्यंत ज्यांचं योगदान आहे, त्या गोपीनाथ मुंडे यांची मी कन्या आहे.

त्यांनी मला राजकारणात आणले आणि स्वत: ढोक महाराजांनी सांगितले, इथे मारुलकर असतील ते सांगतील जेव्हा मुंडे साहेब मंत्री झाल्यावर भगवान गडावर आले, तेव्हा ढोक महाराजांना ते म्हटले, माझ्या पंकजाकडे लक्ष द्या. भगवान गडावर जेव्हा मुंडे साहेब शेवटचे आले होते, तेव्हा ते म्हणाले होते मला भगवानगडावर पंकजा दिसते. हे माझं प्रमोशन करण्यासाठी नाही. पण पंकजाचीच काळजी घ्यावी म्हणजे त्यांना फक्त माझीच काळजी आहे असं नाही. त्यांना माहितीय तुम्ही फक्त पंकजाची काळजी घ्या पंकजा तूमची बाकीची सगळी काळजी घेईल. कारण मला माहिती आहे, माझं आणि माझ्या बाबांच नातं काय होतं. मी कधी त्यांची बहिण झाले, कधी आई झाले, कधी मुलगी झाले आणि आयुष्यभरासाठी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचे काम बघत आहे. हे काम करत असताना जर डोळे बंद मुंडे साहेबांचे स्मरण केले तर आपल्याला एक वाक्य आठवत राहते, कानात गुंजत राहते ते म्हणजे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. हे वाक्य गोपीनाथ मुंडे यांनी जेव्हा उच्चारले त्यानंतर मी हजारो वर्ष उच्चारले तरीही त्या वाक्याचे महत्त्व कमी होणार नाही. मुंडे साहेब हे वाक्य उच्चारत होते ते तुमच्यासाठी उच्चारत होते. कारण थकलेल्या, रुकलेल्या, वंचितांना वाली बणण्यासाठी मुंडेसाहेब त्या वाक्याचा उच्चार करत होते. कोणाला धमकावण्यासाठी, कुणाला सांगण्यासाठी, इशारा देण्यासाठी ते या वाक्याचा उच्चार करत नव्हते. ज्याला इशारा मीळायचा त्याला इसारा मिळतच असतो.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी हजारवेळा माझ्या भूमिका सांगितल्या आहेत. मी दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितले आहे. याच गडावर अनेकदा बोलले आहे. सारखे माध्यमांमध्ये हेच चालले आहे. पंकजा मुंडे यांनी काहीही बोलले तर त्या बोलण्याचे नंतर पोस्टमॉर्टम. मी त्यांना दोष देत नाही. केवळ दोष त्यांचा नाही, परिस्थिती जी झाली आहे, त्याचा दोष आहे. कारण गेल्या पाच वर्षात ज्या घटना घडल्या आहेत. पाच वर्षात माझ्या पक्षासह प्रत्येक पक्षाने ज्या भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वाक्य कुणाला ना कुणाला लागु पडत आहे.

मी राजकारणात आहे, ती केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे, मी माझ्या परिवाराचं भल करण्यासाठी नाही, मी माझ्या स्वत:च्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्हे लोकांसाठी आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येकवेळी जी भूमिका घेतली आहे. जो शेवटचा माणूस आहे, त्याच्यासाठी माझी भूमिका आहे. ती निभवताना मला कधीतरी मला असे वाटले की ज्यांच्यासोबत मी काम करते त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तर ती व्यक्त करण्याचे संस्कार गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला दिले आहेत, असे गोपीनाथ मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, नामांतराच्या चळवळीत गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते की नाही?, ती भूमिका पक्षाची होती?, मुडे साहेबांनी ओबीसींची जनगणना व्हावी अशी मागणी केली होती की नाही? भूमिका पक्षाची होती ?, मुंडे साहेबांनी बहुजनांच्या हितासाठी गरिबांच्या वंचितांच्या हितासाठी नेहमी पुढची भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना पाठींबा देणारा आपला नेता गोपीनाथ मुंडे आहे, आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका म्हणणारे ही मुंडे साहेब आहेत. त्यामुळे भूमिका समाजहिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल म्हणून भूमिका घेणारा व्यक्ती एखाद्या वेळी आमदारकी, खासदारकी, राज्यमंत्री, मंत्रीपद मिळवू शकतो, पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळ मिळालेल नाही. मला परळीतून पराभव स्विकारावा लागला. मला सहज काय मिळालं नाही तर मी काय करायला पाहिजे. माझी जी खरी आत्म्याची भूमिका आहे ती निभवायला पाहिजे.

मला जर भूमिका घ्याची आहे, तर पंकजा मुंडे अशीच तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुम्हा सगळ्यांसमोर भूमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवणाऱ्याएवढे खांदे तर मला अजून मिळाले नाहीत. मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मी जाहीर केल्या त्याभूमिकेविषयी मी प्रामाणिक आहे.

अनेक लोकं निवडणूका हरले त्यांना सधी दिली. कदाचित दोन डझन आमदार, खासदार झाले गेल्या चार वर्षात त्यामध्ये जर मी बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ती चर्चा मी ओढवलेली नाही. पण माझ्या मनात विश्वास आहे. माझा नेता आहे अमित शाह मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळं बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे, कारण माझा पिता आता जिवंत नाही. त्यांच्याशी मी बोलणार हितचिंतक खुप आहेत, दुसऱ्याही पक्षात आहेत. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानते. रडगाणे गाणारी मी नाही. बाप मेला तरी डोळ्यात अश्रु येऊ दिला नाही मी, शपथ खाल्लेली माणूस आहे मी. मला आज तुमच्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगायचं आहे. तुमच प्रेम, तुमची दिशा आणि तुमची दशा हेच माझं राजकारण ठरवणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, वैद्यनाथ कारखान्याला पुर्ववत करणे हे एकच आता माझे स्वप्न आहे. माझी भूमिका बदलणार नाही, झुकणार नाही. मला काहीतरी द्या म्हणून मी कुणासमोर पदर पसरणार नाही. मला कंटाळा आला आहे, अशा बातम्यांचा, चर्चांचा. तावडे साहेबंनी माझ्याबद्दल योग्य उत्तर दिले. बावनकुळे साहेबांनी दिले, इतर पक्षातील नेत्यांनी जे सन्मानजणक वक्तव्य केलं त्याबद्दल मी त्यांची आभार मानते.

हे सुद्धा वाचा

पावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही… मग हे वाचाच

ओडिसा रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य…  

पंकजा मुंडे म्हणाल्या, कशाच्या आडून मी भूमिका घेते हा काय माझा स्वभाव नाही. सत्य हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असते. मला निर्णय घेण्यासाठी कोणत्याही आडपडद्याची गरज नाही. मी माझ्या नेत्यांशी संवाद साधणार आहे, या सगळ्या घटनांबद्दल त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे. त्यांना विचारणार आहे. माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे ही स्पष्टता माझ्या लोकांना आल्या शिवाय मला पुढे त्यांना विश्वास बांधून देता येणार नाही. त्यानंतर जे काही होईल ते असच एखाद्या मंचावरुन सांगेन पण आज मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरनार्थ मला हे धारिष्ट्य झाले. की मी हे बोलावे हे धारिष्ट्य मुंडे साहेबांनी आम्हाला दिला आहे. तो स्वभाव कायम ठेवून वंचितांचा, शेवटच्या माणसाचा वाली होऊन शेवटच्या श्वासापर्यंत मी हे करत राहीन

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी