मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; एमएमआर क्षेत्रात होणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार संवेदनशील पावले उचलत आहे. मुंबईतील गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवत ती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) देखील राबविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात ही योजना एमएमआरमध्ये राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील पायाभुत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी शहरातील रस्ते, चौक, फुटपाथ, फ्लायओव्हर्सचे सुभोभिकरण देखील वेगात केले जात आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सरकारने भक्कमपणे पावले उचलली आहेत. तसेच मुंबईत आणि मुंबई महानगर प्रदेशात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सागितले. यावेळी मुंबई फर्स्ट संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्विनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा
अदानी एनडीटीव्ही संचालक मंडळावर येणार
‘त्या’ घटनेनंतर कोरियन युट्युबर महिलेची पहिली प्रतिक्रीया…
कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता खासदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जगातील सुंदर शहर मुंबई असावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आम्ही पावले उचलत असून शहरातील रस्त्यांचे देखील येत्या काळात काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते उभाऱण्यावर आता आमचा अधिक भर असेल.

तसेच मुंबईतील कोळीवांड्याचा मुद्दा देखील महत्त्वाचा असून कोळीवाड्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी कोळीवांड्यांची संस्कृती, खाद्य संस्कृती जपण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबईत सध्या कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. जागतिक तापमानवाढीच्या दृष्टीने विचारमंथन व्हावे मुंबईतील बदलत्या तापमानाच्या अनुशंगाने येत्या काळात आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत देखील यावेळी बैठकीत चर्चा झाली.

प्रदीप माळी

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

7 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

7 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

10 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

11 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

12 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

12 hours ago