25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमुंबई'त्या' घटनेनंतर कोरियन युट्युबर महिलेची पहिली प्रतिक्रीया...

‘त्या’ घटनेनंतर कोरियन युट्युबर महिलेची पहिली प्रतिक्रीया…

या घटनेनंतर संबंधीत महिलेची प्रतिक्रीया समोर आली आहे, '' माझ्याबाबतीत याआधी दुसऱ्या देशामध्ये देखील अशी घटना घडली होती.

मुंबईतील खार परिसरात एका कोरियन युट्यूबर महिलेचा दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगाने सुत्रे हलवित आरोपींना अटक केली आहे. काल रात्री खार परिसरात ही महिला स्ट्रिमींग करत असताना दोन तरुणांनी तीच्याशी छेडछाड केली यावेळी साधारण 1000 लोक तेथे होते. या घटनेचा व्हिडीओ एका तरुणाने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या ट्विटमध्ये त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग केले होते. त्यांनंतर पोलिसांनी कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून चांद मोहम्मद (वय 19) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (वय 20) अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेनंतर संबंधीत महिलेची प्रतिक्रीया समोर आली आहे, ” माझ्याबाबतीत याआधी दुसऱ्या देशामध्ये देखील अशी घटना घडली होती. त्यावेळी मी पोलिसांशी संपर्क करुन देखील काहीही उपयोग झाला नव्हता. भारतात मात्र पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई केली. गेले तीन आठवड्यांहून अधिक काळापासून मी मुंबईत आहे. तसेच आणखी काही काळ मी येथे राहणार आहे. या पुढील माझा प्रवास आणि अद्भूत भारताचे दर्शन घडविण्यासाठी या वाईट घटनेने इच्छाशक्ती कमी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही.

दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही घटना व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार मनीषा कायंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा
कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता खासदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !
भारताच्या पाहुणीबाबत ‘हे’ घडणं संपाजनक; सुप्रिया सुळेंची कठोर कारवाईची मागणी
अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल !

हा व्हिडीओ आदित्य नावाच्या ट्विटर हॅँडलवरून व्हायरल करण्यात आला होता. त्यात त्याने म्हटले आहे की, काल रात्री कोरियातील एक स्ट्रीमरला खारमधील काही तरुणांनी त्रास दिला. यावेळी साधारण एक हजार लोकांची गर्दी तेथे होती. हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत दोघा तरुणांना अटक केली आहे. मुंबई पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!