मुंबई

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : आगामी पावसाळ्यात पूराचे नियोजन करताना महसूल, पोलीस , जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी यांनी परस्पर समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री (Jayant Patil) जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. (Jayant Patil said take care that the citizens in rainy season)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यांच्या समस्या (Jayant Patil) जाणून घेतल्या. यावेळी सचिव विलास राजपूत, सहसचिव तथा मुख्य अभियंता अतुल कपोले, आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानक पणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता (Jayant Patil) भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी.

पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे.
वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतर राज्य मुद्दे आहेत तिथे त्या त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (Jayant Patil) जयंत पाटील यांनी दिल्या.

विदर्भात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पर्याय अंमलात आणावे, नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावे अशा महत्त्वपूर्ण (Jayant Patil) सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा :-

Monsoon clouds of discord over Almatti: Maharashtra gears up to discuss flash floods with Karnataka

दापोलीचे रिसॉर्ट परबांच्या मालकिचे, सोमय्यांनी सादर केले पुरावे

भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढवली

Jyoti Khot

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

12 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

12 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

12 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

12 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

15 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

15 hours ago