मुंबई

Mangal Prabhat Lodha : ‘आता तरी थांबा…’ मंगल प्रभात लोढांच्या उत्तरावर पिकला हशा

राज्यात नवे सरकार आल्यानंतर पहिले पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आजच्या चौथ्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांतील गुगली, आरोप – प्रत्यारोपमध्ये विधान परिषदेचा प्रश्नोत्तरांचा तास कमालीचा वादळी ठरला असला तरी यावेळी भाजपनेते आणि राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता आणि नाविण्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मिश्कील उत्तराने सभागृहाचे वातावरण बदलून गेले. मंत्रिमंडळात नुकतीच वर्णी लागलेल्या अनेक मंत्र्यांना विरोधक प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळून टाकत आहे. लोढा यांच्यासोबत सुद्धा असेच काहीसे झाले त्यामुळे त्यावर उत्तर देत मी नवीन प्लेअर आहे आणि माझ्यावर बाऊन्सरवर बाऊन्सर टाकताहेत, असे म्हणून त्यांनी त्यांची अडचण सभाहाला सांगताच एकच हशा पिकला.

विधान परिषदेच्या आजच्या प्रश्नोत्तरांच्या तासाला भाजप नेते निरंजन डावखरे रोजगाराबाबत प्रश्न उपस्थित करताना म्हणाले, शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी माझा प्रश्न आहे. जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्या ऐवजी या कामांसाठी बेरोजगारांना शासन समाविष्ठ करून घेणार का, या संदर्भात शासन एखाद्या पाॅलिसीचा शासन विचार करीत आहे का असे म्हणून त्यांनी प्रश्नाचा चेंडू लोढा यांच्या कोर्टात टाकला. त्यावर मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ उत्तर दिले, शिवाय डावखरे यांनी एकाचवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुद्धा त्यांनी मिश्किलपणे टोला लगावला.

हे सुद्धा वाचा…

MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे लवकरच राज्यभर ‘महाप्रबोधन’

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंघाने उपस्थित केलेल्या मुद्यांवर बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेअर आहे. त्यात मला ओपनिंगला उभं केलं आहे आणि माझ्यावर बाऊन्सरवर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही, लोढा यांच्या या मिश्किल उत्तराने सभागृहातील कोणालाच हसू थांबवता आले नाही. पुढे लोढा म्हणाले, तुमच्या सर्व प्रश्नांना मी सविस्तर उत्तर देईन असे म्हणून त्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांना आश्वस्थ केले.

दरम्यान, सकाळच्या सदरात सभागृहात दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या निधनासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत मुंबई – पुणे एक्सप्रेसवर चौपदरीकरणाचा सल्ला राज्य सरकारला दिला, त्यावर प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

27 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

46 mins ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago