राजकीय

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

यावर्षीचे विधानपर‍िषदेचे पावसाळी अधिवेशन खूप गाजले आहे. नवीन सरकारचे हे पहिलेच अध‍िवेशन आहे. मागच्या वेळी सत्तेमध्ये असलेले या वेळी विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. या वेळी विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी इडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आजचे सोमवारचे अधिवेशन चांगलेच रंगले. ते नगर‍ परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत या विधेयकावरुन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान सभेत तुफान फटकेबाजी करुन सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यंमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो.

राज्याचे ‘नाथ’ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये अशी कोपखळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. नगर परिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत. या विधेयकावर चर्चा होत असतांना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध केला. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. त्यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा न‍िर्णय मंत्रीमंडळात मंजुर करुन घेतला होता आणि आता त्यांनी भाजप सोबत घरोबा केला आहे. त्यानंतर त्यांनी बरोबर याच्या विरुध्द निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी ऐकनाथ होऊ नये असा सल्ला धनंजय मुंडेनी दिला.

हे सुद्धा वाचा

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर पाणी फिरेल. जर असा निर्णय घेतला तर, नगर परिषद निवडणुकीत पक्ष कोणता आण‍ि नगराध्यक्ष कोणता अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याउपर हा निर्णय घ्यायचा असेल तर मग मुख्यमंत्री हा जनतेतून होऊ द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी सरकारला केले. धनंजय मुंडेच्या या विधावरुन सर्व पक्षांतील‍ नेत्यांना हसू अवरले नाही.

रूपाली केळस्कर

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

1 hour ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

2 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

3 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

6 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

7 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

7 hours ago