मुंबई

Mumbai Rape Case : 14 वर्षीय तरुणीवर भावाकडून वारंवार बला’त्कार! गर्भवती झाल्यानंतर गैरप्रकार उघड

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या माहितीतील व्यक्तींचा समावेश असल्याचे पाहायला मिळत असते. त्यामुळेच पिडीत या प्रकरणातील तक्रार दाखल करण्यात किंवा आपल्या कुटुंबीयातील व्यरक्तीसमोर आपले दुःख उघड करताना घाबरलेल्या दिसतात. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत घडल्याचे आढळून आले आहे. मुंबईत एका 34 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय तरुणीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी (23 ऑक्टोबर) ही माहिती दिली. त्याने सांगितले की, पीडित महिला संबंधातील आरोपीची बहीण असल्याचे दिसते आणि ती गर्भवती राहिल्यानंतर गुन्हा उघड झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. सध्या मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी काय माहिती दिली
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनोग्राफीमध्ये मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुंबईतील सांताक्रूझ भागातील वाकोला पोलिस स्टेशन गाठले. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे तिच्या नातेवाईकाच्या 34 वर्षीय भावाने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. यानंतर त्याने तिला अनेकवेळा आपल्या वासनेची शिकार बनवले.

हे सुद्धा वाचा

diwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट; वाचा काय म्हणाल्या क्रांती रेडकर

Thane News : मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात दिवाळीला ग्रहण! एकाच दिवसांत फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “आम्ही भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कर्जत ज्यांच्या अखत्यारीत येते, आम्ही हे प्रकरण नेरळ पोलिस ठाण्याकडे सोपवले आहे.” आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील बलात्काराच्या घटना
यापूर्वी मुंबईतच एका पंचतारांकित हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याच्या वरिष्ठ साथीदारावर बलात्कार केला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी काही दिवसांपासून तिला धमकावून तिचा लैंगिक छळ करत होता. आरोपींवर जातीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत ​​असे. यापूर्वी एका तरुणीने नौदलाच्या जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, गेल्या काही काळात होणारे अत्याचारांचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत असले तरीही अद्याप महिलांना पूर्णपणे सुरक्षितता प्रदान करण्यात पोलिस प्रशासन असमर्थ ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महिलादेखील संपूर्ण सुरक्षितपणे समाजात वावरताना दिसत नाहीत.

प्रणव ढमाले

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

23 mins ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

1 hour ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

1 hour ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

2 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

2 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

4 hours ago