मुंबई

शिवसेनेमुळेच आघाडीची लाज राखली गेली!

महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी, मंत्र्यांची आक्षेपार्ह विधाने, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आदी मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला होता. या मोर्चाला अपेक्षीत गर्दी झाली नाही, काँग्रेसचे, नेते मेहनत घेताना दिसले नाहीत, राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते या मोर्चात ज्या संख्येने उपस्थित रहायला हवे होते तेवढे नव्हते. महाविकास आघाडीची लाज शिवसेनेने राखल्याचे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी म्हटले आहे.

हेमंत देसाई म्हणाले, महामोर्चास अपेक्षित गर्दी झाली नाही, हे सत्य आहे. अशोक चव्हाण यांना विवाहसोहळ्यास हजर राहण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांना कदाचित तातडीचे काम असल्यामुळे उशीर झाला, तोपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद झाले होते. मराठवाड्यातून मोर्चासाठी कार्यकर्ते तरी पाठवता आले असते. तेही कितपत झाले, हा प्रश्नच आहे. काँग्रेसचे भाई जगताप आणि नसीम शेख यांनी थोडीफार धावपळ केली, परंतु इंग्रजी चॅनेल्सवर आणि वर्तमानपत्रांत सतत चमकोगिरी करणारे मिलिंद देवरा तसेच चरणजितसिंग सप्रा यांनी मोर्चासाठी काहीही प्रयत्न केल्याचे दिसले नाहीत. उपक्रमशील अस्लम शेख यांनी मोर्चासाठी नेमके काय योगदान दिले, हा संशोधनाचा विषय आहे. मुंबई काँग्रेसची ताकदच दिसली नाही. असे हेमंत देसाई म्हणाले.

मुंबई आणि बारामतीहून राष्ट्रवादीचे नेते व काही कार्यकर्ते आले, परंतु राष्ट्रवादीची ताकद या मोर्चात फारशी दिसलीच नाही. अर्थात अजितदादांनी जिवापाड मेहनत घेतली, पण त्यांना पक्षातील इतरांची पुरेशी साथ न लाभल्यामुळे की काय, अपेक्षित गर्दी जमवता आली नाही. जर मोर्चाला 70 हजार असतील, तर त्यापैकी 40,000 लोक हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सैनिक व पाठीराखेच होते, अशी माहिती मिळते, असे हेमंत देसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा

PHOTO: महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चात उसळला जणसागर….

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!

शिवसेनेसाठी अजय चौधरी, राजन विचारे, अनिल परब, किशोरीताई पेडणेकर, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, वरळीचे आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर, पांडुरंग सकपाळ, सचिन अहिर या व इतर काही नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली, हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. परंतु महाविकास आघाडीचा हा महामोर्चा असल्याचे वाटलेच नाही! शिवसेनेमुळेच आघाडीची लाज राखली गेली, परंतु लाखो लोक येतील असे जे वाटले होते, तसे काही घडले नाही, असल्याचे हेमंत देसाई म्हणाले.

व्यासपीठावर जाऊन भाषण ठोकणे आणि चॅनेल्सना बाइट देणे यामध्ये आघाडीवर असलेले काही नेते, संघटनात्मक बांधणीत, आंदोलनात किंवा पडद्यामागे राहून काम करण्यात सक्रिय असतातच असे नसते, याचा प्रत्यय यावेळीही आला. एक आघाडी म्हणून महाविकास आघाडी अद्याप कमी पडत आहे. काउंटर नॅरेक्टिव्ह तयार करण्यात, प्रभावीआंदोलनांत, मुख्य विषय डायव्हर्ट करण्यात भाजपला वेळोवेळी यश मिळत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही भूमिकांमध्ये आपल्यापेक्षा भाजप अधिक यशस्वी का ठरत आहे, याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करून, शिवाय कठोर आत्मपरीक्षण करून, स्वत:मध्ये सुधारणा घडवली पाहिजे, असे देसाई यांनी म्हटले आहे.

हेमंत देसाई म्हणाले, रोजच्या रोज केवळ पोकळ वल्गना करणे, अतिरेकी विधाने करणे, किंवा मर्यादा सोडून बोलणे तसेच ‘हे सरकार आज पडणार, उद्या पडणार’ अशा निव्वळ बाता मारत बसल्यास, हाती काहीएक लागणार नाही! दुसऱ्याची रेष कमी करण्यापेक्षा, स्वतःची रेष मोठी करणे, हेच महत्त्वाचे मानले पाहिजे.

प्रदीप माळी

Recent Posts

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

42 mins ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

2 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

18 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

18 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

19 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

19 hours ago