25 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरमुंबईIPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात...

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पक्षांनी महापुरुषांची बदनामी, सीमाप्रश्न, बेरोजगारी अशा अनेक मुंद्द्यावर महामोर्चा काढला. या मोर्चासाठी राज्यभरातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मुंबईत पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त देखील ठेवला होता. या मोर्चा दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांचे मोठे कौतुक होत आहे. आपल्या मुलीच्या डोक्यावर अक्षता न टाकता ते खाकी वर्दीचे कर्तव्य बजावण्यासाठी तो तातडीने बंदोबस्तासाठी हजर राहिले.

आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा होता. तर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर  (IPS Vivek Phansalkar) यांच्या मुलीचे देखील आजच लग्न होते. कोणत्याही बापासाठी कन्यादानाचे कर्तव्य हे मोठेच असते, पण फणसाळकर यांनी आपली मुलगी मैत्रेयी हिचे लग्न बाजूला ठेवून खाकी वर्दीचे कर्तव्य बजावले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुरक्षा आणि कर्तव्याला महत्त्व देत आज मोर्चाच्या बंदोबस्तासाठी ते हजर राहीले.

हे सुद्धा वाचा

…यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद

मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे… शरद पवार कडाडले

विवेक फणसाळकर यांच्या या कृतीचे सोशल मीडियातून देखील जोरदार कौतुक होत आहे. विवेक फणसाळकर हे सन 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 29 जुन रोजी त्यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. च्या आधी त्यांच्याकडे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार होता. विवेक फणसाळकर यांची कर्चव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. कोरोना काळात ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना फणसाळकर यांनी केलेल्या कामाचे देखील राज्यभरात कौतुक झाले होते. यापूर्वी त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख म्हणून देखील काम केले होते. तसेच वर्धा आणि परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी