मुंबई

नवीन आर्थिक वर्षात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (New financial year) सुरू होत आहे. आर्थिक वर्ष बदलल्यावर अनेक महत्त्वपूर्ण बदलांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधारशी पॅनची संलग्नता, इंधन दरातील बदल या बाबी महत्वाच्या आहेत. पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्यांमुळेही आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे.

■ बँकांना १५ दिवस सुट्ट्या
रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे. यानुसार, पुढील महिन्यात १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. साप्ताहिक सुट्ट्या वगळता विविध राज्यांतील वेगवेगळ्या सणांच्या सुट्टया असल्याने १५ दिवस बँकांना सुट्ट्या असतील.

■ आधारशी पॅन संलग्नता
पॅन आधारशी संलग्न करणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ मार्चची अंतिम मुदत आहे. या मुदतीत आधारशी पॅन संलग्न केले गेले नसल्यास ते निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे समभाग व्यवहारसह अनेक महत्त्वाचे व्यवहार पुढील महिन्यात अडकू शकतात.

■ सोने विक्रीच्या नियमांत बदल
ग्राहक मंत्रालयाने पुढील महिन्यापासून सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत मोठा बदल केला आहे. यानुसार ३१ मार्चनंतर दागिन्यांवरील चार अंकी ‘हॉलमार्क क्रमांक ३१ मार्चनंतर बंद होणार आहे. १ एप्रिलपासून सहा अंकी ‘हॉलमार्क’ प्रमाणित दागिन्यांची विक्री बंधनकारक असणार आहे.

■ करप्रणालीच्या निवडीसह कर नियोजनाची आखणी
नवीन करप्रणालीनुसार वार्षिक ७.५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर २०२३ २४ आर्थिक वर्षांपासून लागू होईल. करदात्यांनी आपल्या उत्पन्नाची चाचपणी करून, नवी अथवा जुनी यापैकी कोणती प्रणाली निवडायची याचा निर्णय घेऊन, कर नियोजन आखावे.


■ इंधन दरातील बदल
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरातील बदल जाहीर करतात. मार्च महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली होती. याचवेळी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ३५० रुपये वाढ करण्यात आली होती. आता पुढील महिन्यात त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : 

Budget 2023: अर्थमंत्र्यांच्या भाषणात असतील हे काही खास आर्थिक शब्द, त्यांचा अर्थ जाणून घ्या म्हणजे तुम्हालाही सहज समजेल अर्थसंकल्प

नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

Team Lay Bhari

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

10 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

11 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

11 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

11 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

13 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

13 hours ago